---Advertisement---

IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडची झंझावती शतकी खेळी, पिंक बाॅल कसोटीत रचला अनोखा इतिहास!

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ट्रॅव्हिस हेड जेव्हा भारताविरुद्ध मैदानात उतरतो तेव्हा तो वेगळ्याच अंदाजात दिसतो. त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी कठीण काम आहे. शनिवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटीत असेच दृश्य पाहायला मिळाले. ॲडलेडमध्ये मालिकेतील दुसरा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे. ज्यात हेडने शतक झळकावून भारताविरुद्ध पुन्हा कहर कामगिरी केला. त्याने पहिल्या डावात 140 चेंडूत 140 धावा केल्या. ज्यात 17 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. 30 वर्षीय हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे आठवे शतक ठरले.

वास्तविक ट्रॅव्हिस हेडने दिवस-रात्र कसोटीत सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्याने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला आहे. त्याने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध 112 चेंडूत शतक झळकावले होते. पिंक बॉल कसोटीत त्याने 125 चेंडूतही शतक पूर्ण केले आहे. इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रुटने 2017 मध्ये 130 चेंडूत शतक झळकावले होते. पिंक बाॅल कसोटीत प्रत्येकी दोन शतके झळकावणारा पाकिस्तानचा असद शफीक आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांचा विक्रम त्याने मोडला आहे.


दिवस-रात्र कसोटीतील सर्वात वेगवान शतक (चेंडू) 

111 चेंडू- ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंडिया ॲडलेड 2024

112 चेंडू-  ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड होबार्ट 2022

125 चेंडू- ट्रॅव्हिस हेड विरुद्ध वेस्ट इंडिज ॲडलेड 2022

130 चेंडू जो रूट विरुद्ध वेस्ट इंडिज एजबॅस्टन 2017

140 चेंडू असद शफीक विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन 2016

पर्थ कसोटीतही ट्रॅव्हिस हेडने अर्धशतकी खेळी खेळली होती. जी भारताने 295 धावांनी जिंकली. हेडने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 101 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 89 धावा केल्या होत्या. त्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये शतकी खेळी खेळून भारताच्या ट्रॉफीच्या स्वप्नांचा भंग केला आहे. त्याने टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध अर्धशतकही झळकावले आहे. त्याचबरोबर आता हेडने भारताविरुद्ध पिंक बॉल कसोटीत विक्रम केला आहे. दुसऱ्या कसोटीत भारत पहिल्या डावात 180 धावांवर बाद झाला होता. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलियाने 85षटकांचा खेळ संपेपर्यंत 332/8 जोडले.

हेही वाचा-

इंग्लंडने टेस्टमध्ये 5,00,000 धावांचा आकडा गाठला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम
जो रूटचे खास शतक! द्रविडचा रेकाॅर्ड मोडला, आता नंबर पाॅन्टिंगचा
जसप्रीत बुमराहचा शोध कसा लागला? दिग्गजाने सांगितली सर्व गोष्ट! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---