भारतीय संघाने रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या टी20 सामन्यात 44 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा भारताचा सलग दुसरा विजय होता. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. भारताच्या या विजयाचा शिल्पकार यशस्वी जयसवाल ठरला. त्याने सामन्यात केलेल्या वादळी फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार मिळवल्यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने सामन्यात फक्त 25 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 53 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला.
सामन्यानंतर बोलताना जयसवाल म्हणाला, “ही खेळी माझ्यासाठी खास होती. मी याचा खूप आनंद घेतला. मी माझे सर्व शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मी निर्भीड होऊन खेळलो आणि गोलंदाजांवर दबाव आणला. मला माझ्या शॉट्स खेळण्यावर पूर्ण विश्वास होता.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मला सूर्या भाई आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी म्हटले की, मोकळेपणाने खेळ. मी नेहमी विचार करतो की, कशाप्रकारे अनुभवी खेळाडूंजवळ राहून स्वत:मध्ये सुधारणा करू शकतो. मी फक्त सातत्याने शिकत आहे.”
ऋतुराजच्या धावबादवर काय म्हणाला जयसवाल?
यशस्वी जयसवाल याने मागील सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला धावबाद करण्याविषयीही भाष्य केले. तो म्हणाला, “मी अजूनही शिकत आहे. त्यावेळी चूक माझी होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि माफी मागितली. स्टॉयनिस माझ्या वाटेत होता. मी आधी धावण्यासाठी तयार होतो, पण मी निर्णय बदलला. मी चुकीचा कॉल दिला. मी मान्य करतो की, माझी चूक होती आणि असे होत असते. ऋतु भाई खूपच सौम्य आहे आणि त्याने मला जिममध्ये म्हटले की, पुढच्या वेळी आपण जेव्हा धावू, तेव्हा जोखीम घ्यायची नाही. मी माझ्या फिटनेस आणि शॉट्स खेळण्यावर खूप मेहनत केली आहे. माझा विश्वास आहे की, या स्तरावर मानसिक मजबूती जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवशी चांगले बनण्याचा माझा प्रयत्न असतो.”
Yashasvi Jaiswal on that runout:-
“It was my mistake. I went to him and said sorry. I made the wrong call. Mistakes happen. Rutu bhai said, When we are running, we will take secure singles. Rutu bhai is very humble and caring.”
Rutu-Wal duo is ready to rock the T20 World Cup ❤️ pic.twitter.com/vNCzRA6mh0
— Yash (@CSKYash_) November 26, 2023
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना जयसवाल (53), ऋतुराज गायकवाड (58) आणि ईशान किशन (52) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 235 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 191 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 44 धावांनी जिंकला.
मालिकेतील तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. (ind vs aus 2023 player of the match yashasvi jaiswal statement after won 2nd t20)
हेही वाचा-
IPL Auctionपूर्वी ‘या’ संघाकडे आहे बक्कळ पैसा, कोणत्या संघाकडे किती रक्कम? एका क्लिकवर घ्या जाणून
कोण करणार गेलचा IPLमधील 175 धावांचा रेकॉर्ड मोडण्याची डेरिंग? स्वत: ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणाला, ‘तो फलंदाज…’