---Advertisement---

श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 9:25 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन वनडे सामन्यांची मालिका २७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला जाणार असून, दोन्ही संघ त्याची जोरदार तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर भारतीय संघाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल.

भारताच्या वनडे संघात या वेळी मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्मा नाही. रोहितला केवळ कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित नसला, तरी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनेक जबरदस्त खेळाडू आहेत.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघातील अन्य फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. भारतीय संघात असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता आहे. आम्ही तुम्हाला आज त्या तीन भारतीय फलंदाजांविषयी सांगणार आहोत, जे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करू शकतात.

१. शिखर धवन

भारतीय संघाचा प्रमुख सलामीवीर शिखर धवन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये त्याने सलग दोन शतके ठोकून इतिहास रचला. आयपीएल २०२० मध्ये शिखरने केएल राहुलनंतर सर्वाधिक ६१८ धावा काढल्या होत्या.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनवर मोठी जबाबदारी आहे. शिखरला ऑस्ट्रेलियातील वातावरणात आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. शिखरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. शिखर या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असू शकतो.

२. विराट कोहली

आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर सर्व क्रिकेटप्रेमींची नजर असेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे कोहलीवर भारतीय फलंदाजीची मदार राहील. भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल, तर कर्णधार कोहलीला मोठ्या खेळ्या कराव्या लागतील.

मागील काही कालावधीपासून विराटने अपेक्षेप्रमाणे धावा केल्या नाहीत. त्यामुळे, येणाऱ्या मालिकेत विराट धोकादायक ठरू शकतो. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्याची दाट शक्यता आहे.

३. केएल राहुल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत केएल राहुल सर्वात लक्षवेधी खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२० मध्ये त्याने सर्वाधिक ६७० धावा काढल्या होत्या. आयपीएलमधील कामगिरीनंतर त्याची भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. आयपीएलमध्येही कर्णधार झाल्यानंतर त्याने अफलातून फलंदाजी केली होती. तो अत्यंत जबाबदारीने संपूर्ण स्पर्धेत खेळताना दिसला होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला सलामीवीर म्हणून संधी देण्यात येऊ शकते. राहुलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होण्याची क्षमता आहे.

ट्रेंडिंग लेख-

बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित

‘या’ ३ भारतीय शिलेदारांचा असू शकतो अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा; दुसरे नाव आश्चर्यकारक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?

‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार’, भारतीय घातक वेगवान गोलंदाजाची प्रतिक्रिया

टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---