भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 9 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया अजूनही 193 धावांनी पुढे आहे. चौथ्या दिवशीही फॉलोऑनचा विषय चर्चेत राहिला. अखेर बऱ्याच मेहनतीनंतर टीम इंडियाला 246 धावांचा टप्पा पार करत फॉलोऑन वाचवण्यात यश आले. भारतासाठी सध्या जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप क्रीजवर आहेत. ज्यांच्यामध्ये 39 धावांची निर्णायक भागीदारी झाली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 51 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली, शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाले. चौथ्या दिवशी भारताने आपला डाव 51 धावांवरुन सुरु केला. मात्र कर्णधार रोहित शर्मा केवळ 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर संघाला केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने सावरले. ज्यात राहुलने 84 तर जडेजाने 77 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताीय संघाच्या केवळ 74 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. अशा स्थितीत टीमला फॉलोऑन वाचवण्याचा धोका होता. मात्र राहुल आणि जडेजा यांच्यातील 67 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन केले. राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने नितीश रेड्डीसोबत 53 धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारी असूनही, एके काळी भारतीय संघाने 213 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या आणि तरीही फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावा करायच्या होत्या.
यानंतर जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे फलंदाज असूनही फलंदाजीत परिपक्वता दाखवली. चौथ्या दिवसअखेर आकाशदीप 27 तर जसप्रीत बुमराह 10 धावांवर नाबाद आहे. त्यांच्या 39 धावांच्या भागीदारीने ब्रिस्बेन कसोटीत भारताला जिवंत ठेवले आहे. फॉलोऑन टाळले नसल्यास ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले असते. ज्यामुळे पराभवाशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का बसला असता.
हेही वाचा-
IND vs AUS: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक खेळी, अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय
IND VS AUS; रोहित शर्माची सरासरी SENA देशांमध्ये भुवनेश्वर कुमारपेक्षा कमी
रिंकू सिंगची कर्णधारपदी नियुक्ती, या प्रमुख स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करणार