भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबा मैदानावर खेळली जात आहे. दोन्ही संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकमेकांशी बरोबरीत आहेत. पण ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला, तर रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
केकेआरमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हर्षितने पर्थ कसोटीत एकूण 4 विकेट घेतल्या होत्या, मात्र ॲडलेड पिंक बॉल कसोटीत खराब गोलंदाजीमुळे त्याला आपले स्थान गमवावे लागले. गुलाबी चेंडूच्या कसोटीत हर्षितने 16 षटकांत 86 धावा दिल्या. अशा परिस्थितीत त्याची जागा आकाशदीपला देण्यात आली आहे. ज्याने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यात 10 बळी घेतले आहेत. ॲडलेड कसोटीत रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली, पण चेंडू आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत तो आपली छाप सोडू शकला नाही.
ॲडलेड कसोटीत हर्षित राणाला त्याची लाईन आणि लेंथ अचूक ठेवता आली नसल्याचे दिसून आले. या कारणामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याला चांगलेच फटकारले. दुसरीकडे, आकाशदीप एकाच विकेटवर सतत गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळेच प्रसिद्ध कृष्णापूर्वी त्याला या मालिकेत संधी देण्यात आली आहे. दरम्यान, फलंदाजीबद्दल बोलायचे तर प्लेइंग इलेव्हनची घोषणा पाहता रोहित शर्मा पुन्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे दिसते.
तिसऱ्या कसोटीसाठी भारताचे प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप
हेही वाचा-
मैदानावर पुन्हा मॅच फिक्सिंग, संघ मालकाला झाली अटक!
SMAT; दिल्लीचा धुव्वा उडवत मध्य प्रदेशची फायनलमध्ये एँट्री…!
IND vs AUS; गाबा कसोटीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकाॅर्ड