भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) खेळला गेला. रायपूरच्या शहीद वीर नारायन सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने 20 धावांनी विजय मिळवला. 175 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकात 154 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने या सामन्यात मोठी धावसंख्या केली नाही, असे वाटत होते. पण गोलंदाजांनी कसलेले गोलंदाजी केली आणि भारताला मालिका जिंकवून दिली.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांमध्ये 40 धावा हव्या होत्या. 19व्या षटकात मुकेश कुमार याने 9 धावा खर्च केल्या आणि ऑस्ट्रेलियन संघ विजयापासून 31 धावा दूर होता. शेवटच्या षटकात गोलंदाजीला आलेल्या आवेश खान याने 6 चेंडूत 10 धावा खर्च केल्या आणि भारतीय संघ जिंकला. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार मॅथ्यू बेड याने 36* धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण एकटा कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली होती आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. 20 षटकांच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सच्या नुकसानावर 174 धावा केल्या. यात सर्वोत्तम खेळी रिंकू सिंग याने केली. रिंकूने 29 चेंडूत 46 धावा केल्या. तर जितेश शर्मा यानेही 35 धावांचे योगदान दिले. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 37, तर ऋतुराज गायकवाड 32 धावांची खेळी करून बाद झाले. या दोघांव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही.
गोलंदाजी विभागातून ऑस्ट्रेलियासाठी बेन द्वारशुइस याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तनवीर संघा आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ऍरॉन हार्डी यानेही एक विकेट घेतली. भारतीय संघासाठी अक्षर पटेल याने 4 षटकांमध्ये अवघ्या 16 धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई यानेही 4 षटकात 17 धावा खर्च करून एक विकेट घेतली. वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि मुकेश कुमार संघासाठी काही अंशी महागात पडले. दीपक चाहरने 4 षटकांमध्ये 44 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेशने 4 षटकात 41 धावा खर्च करून एकही विकेट घेतली नाही. आवेश खान याने 4 षटकात 33 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. (IND vs AUS 4th T2oi India Won the 4th T20I by 20 Runs and Clinched the Series.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया – जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, ऍरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । सलामीवीर ऋतुराजने घडवला इतिहास, एकाही भारतीयाला न जमलेली कामगिरी करून दाखवली
फादर शॉच मेमोरियल आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 । सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश