भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील 3 सामने पार पडले आहेत. यातील पहिले दोन सामने भारताने, तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. यासह भारत मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे. अशात मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. अशात या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. त्यापूर्वी आपण सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…
ऑस्ट्रेलिया संघाचे अनेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यात विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), मार्कस स्टॉयनिस आणि जोश इंग्लिस यांच्याही नावाचा समावेश आहे. चौथ्या टी20 सामन्यासाठी पाहुणा संघ नवीन खेळाडूंसह भारताचा सामना करेल. तसेच, भारतीय (Team India) संघात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुनरागमन करत आहे. तसेच, तो उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसेल. अय्यरला तिलक वर्मा याच्या स्थानी संघात सामील केले जाऊ शकते. तसेच, मुकेश कुमारही त्याच्या लग्नानंतर भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.
खेळपट्टी आणि हवामान
रायपूरच्या या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे सामना खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघ 108 धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच, भारताने सहजरीत्या हा सामना खिशात घातला. टी20 सामन्यात इथली खेळपट्टी वेगळी बनवली जाऊ शकते. लांब बाऊंड्री असल्यामुळे फिरकीपटूंना खेळपट्टी आणि मैदानातून मदत मिळू शकते.
हवामानाविषयी बोलायचं झालं, तर हवामान विभागानुसार, रायपूरमध्ये 1 डिसेंबरच्या सायंकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. जेव्हा सामना सुरू असेल, तेव्हा येथील कमाल तापमान 19 अंश सेल्सियस असेल. या सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे, पण सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस हजेरी लावू शकतो. अशात चाहते या सामन्याचा कोणत्याही अडथळ्याशिवाय आनंद लुटू शकतात.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेकीची वेळ 6.30 आहे. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 किंवा कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच, मोबाईलवर जिओ सिनेमा ऍपवरही सामना पाहता येईल.
संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार
ऑस्ट्रेलिया-
मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रेविस हेड, मॅथ्यू शोर्ट, ऍरॉन हार्डी, बेन मॅकडर्मोट, ख्रिस ग्रीन, टीम डेविड, बेन ड्वारशुइस, नेथन एलिस, जेसन बेहरन्डोर्फ, तन्वीर संघा (ind vs aus 4th t20i match preview predicted eleven weather and live stream know all here)
हेही वाचा-
रोहित आणि विराट बद्दल उलटसुलट चर्चा करु नका, स्वतः बीसीसीआयने दिलंय स्पष्टीकरण
पुन्हा भारताचा मुख्य प्रशिक्षक बनणार राहुल राहुल द्रविड? म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा करार साईन…’