सोमवार (दि. 13 मार्च) हा दिवस भारतीयांसाठी खूपच आनंदाचा ठरला. यामागील कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1ने खिशात घातली. यासोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पोहोचणारा दुसरा संघ ठरला. विशेष म्हणजे, ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आता या गाण्याचा फिव्हर भारतीय क्रिकेटपटूंवर चढला आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नाटू नाटू गाण्यावर डान्स केला आणि चाहत्यांसोबत व्हिडिओही शेअर केला.
अश्विन आणि जडेजाने अक्षय कुमारच्या अंदाजात नाटू नाटूवर डान्स
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित ठरला. या सामन्याच्या काही वेळानंतर आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत एक खेळ खेळताना दिसला. या खेळात ते वाटणी करताना दिसत आहेत. जणू काही ते त्यांच्या बक्षीस रकमांची वाटणीच करत आहेत. विशेष म्हणजे, मजेशीर अंदाजात जडेजा अश्विनला फसवतानाही दिसत आहे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडला अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आवाज येत आहे. खेळ संपल्यानंतर अश्विन आणि जडेजा ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स (Ashwin And Jadeja Dance On Naatu Naatu) करतात.
https://www.instagram.com/p/Cpun0PyjpO4/
या व्हिडिओला अवघ्या 2 तासातच 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तसेच, 2 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पडला. याव्यतिरिक्त एक हजाराहून अधिक चाहत्यांनी कमेंट्सही केल्या. या व्हिडिओवर चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी कमेंट्समध्ये हसणाऱ्या इमोजीचा वापर केला आहे. तसेच, मुरुगन अश्विन याने कमेंट करत “एपिक” असे लिहिले आहे.
अश्विनने मोडला कुंबळे अन् भज्जीचा विक्रम
चाहत्यांना भारतीय फिरकीपटूंचा हा अंदाज खूपच आवडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विन आणि जडेजाने खास कामगिरी केली. वैयक्तिक विक्रमांबद्दल बोलायचं झालं, तर दोघांनाही खास कामगिरीसाठी 2.5 लाखांच्या मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेत अश्विन सर्वाधिक घेणारा अव्वल गोलंदाज बनला. त्याने 25 विकेट्स नावावर केल्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या जडेजाने 22 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, अश्विन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांचा विक्रम मोडला आहे. अश्विनच्या नावावर 114 विकेट्स आहेत, तर कुंबळेच्या नावावर 111 आणि हरभजनच्या नावावर 95 विकेट्स आहेत. (ind vs aus 4th test r ashwin and ravindra jadeja plays naatu naatu akshay kumar style see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज
‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक