---Advertisement---

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विराटला सल्ला; म्हणाला…

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 2:46 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट पंडित आपापले विचार मांडत आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी विराटला सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, भारताने कसोटी सामन्यात २ फिरकीपटूंसह पाच गोलंदाज खेळवावेत.

भारताने आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी?, याबद्दल बोलताना अझरुद्दीन यांनी फिरकीपटूंना संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यांच्या मते, “भारतीय संघाने ५ गोलंदाजांसह उतरावे. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळते. पण विराट दोन फिरकीपटूंना संधी देईल का?, अशी मला शंका आहे. सामना जिंकण्यासाठी नेहमी पाच सर्वोत्तम गोलंदाजांना संधी देण्यात यावी, कारण संघाला सामना गोलंदाजच जिंकून देऊ शकतात.”

भारतातील परिस्थितीत आणि ऑस्ट्रेलियन परिस्थितीत फरक
अझरुद्दीन यांच्या मते भारतातील परिस्थिती व ऑस्ट्रेलियन परिस्थितीत बराच फरक असतो. भारतात फिरकीपटूंसाठी मदत असते. फलंदाजीबद्दल बोलताना अझरुद्दीन म्हणाले, “जर तुमचे टॉप ५ फलंदाज धावा करू शकत नसतील, तर तुम्ही सहाव्या फलंदाजाकडून धावांची अपेक्षा ठेवू शकत नाही. भारताने ५ गोलंदाज खेळवावेत.”

भारताला जिंकण्यासाठी चांगल्या धावा बनवणे आवश्यक
फलंदाजीबद्दल बोलताना अझरुद्दीन म्हणाले, “भारतीय फलंदाजी उत्तम आहे. भारताला जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करणे गरजेचे आहे व त्यात त्यांनी चांगल्या धावा बनवणे आवश्यक आहे.” अझरुद्दीन यांनी हार्दिक पंड्याचा समावेश कसोटी संघात करावा अशी मागणीही केली.

ते म्हणाले, “हार्दिक हा उत्तम अष्टपैलू आहे व तो संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करू शकतो. हार्दिकने यापूर्वी देखील संघासाठी उत्तम धावा बनवल्या आहेत.”

क्षेत्ररक्षण ठरू शकते समस्या
अझरुद्दीन यांच्या मते, “भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण हे सामान्य राहिले आहे. भारतीय खेळाडूंनी अनेक झेल सोडले आहेत. त्यामुळे त्यांनी क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे गरजेचे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडला मोठा धक्का! ‘हा’ धडाकेबाज खेळाडू दीड महिन्यासाठी संघातून बाहेर

‘भारतीय गोलंदाजांनी जास्त उताविळपणा दाखवू नये’, कपिल देव यांचे सूचक विधान

‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत

ट्रेंडिंग लेख-

कमालच! एबी डीविलियर्सच्या आधी ‘या’ ३ खेळाडूंनी केली होती विचित्र शॉट्स खेळण्याची सुरुवात

तुम्ही असला की सर्व निवांत असतात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० विकेट्स घेणारे ३ भारतीय धुरंदर

पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---