---Advertisement---

सिडनी कसोटीवरील चिंतेचे ढग कायम; वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयोजनावर संभ्रम

On: शुक्रवार, जानेवारी 1, 2021 9:56 PM
---Advertisement---

सिडनी कसोटीच्या आयोजनातील अडथळ्यांची मालिका अजून संपण्याची चिन्हे नाहीत. गेले काही आठवडे तेथील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिडनीत सामना आयोजित होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामना इतरत्र हलविण्याची तयारी देखील सुरु केली होती. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सिडनीत सामना होणार हे निश्चित करण्यात आले.

मात्र आता पुन्हा एकदा सिडनी मैदानाच्या आसपास कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. ३१ डिसेंबरला सिडनीत कोरोनाचे नवीन १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सिडनीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १७० झाली आहे.

त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया खबरदारीचे उपाय योजण्याच्या विचारात आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार सिडनीतील कसोटी सामना दर्शकांविना खेळवला जाण्याची शक्यता आहे. ब्लू माउंटेन, इलावारा या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. सिडनीच्या मैदानापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बेराला आणि स्मिथफिल्ड येथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे सिडनीतील सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर आहे. तसेच जर प्रेक्षकांना प्रवेश दिलाच तरी त्यांना मास्क बांधणे, अनिवार्य केले जाणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, गेल्या दोन आठवड्यात येथील रुग्णांची संख्या शून्यावरून १७० पर्यंत वाढली असल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या परिस्थितीमुळे प्रसारण कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे. यापूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उशिराने सिडनीत दाखल होण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मालिका रंगतदार स्थितीत 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास मालिका आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळविला तर मेलबर्नच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे मालिका १-१ अशा बरोबरीच्या स्थितीत असून तिसरा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:
युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले हे उत्तर

खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी
भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---