ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने तीन बदल केले आहेत. शुबमन गिल, रोहित आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अश्विनला संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विनच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमनाबाबत सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाला की, हा अनुभवी खेळाडू येथील खेळपट्टीवर अधिक प्रभावी ठरेल,. असा विश्वास भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटतो. गुलाबी-बॉल कसोटीत त्याच्या चांगल्या विक्रमामुळे अश्विनने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टनच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले.
बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करताना भारताला पहिल्या डावात 180 धावांत गुंडाळले. त्यानंतर फलंदाजीत पहिल्या दिवसाखेर एक विकेट गमावत 86 धावा केल्या.
“न्यूझीलंड मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी संघात समाविष्ट केल्यापासून वॉशिंग्टनने काहीही चुकीचे केले नाही,” असे सहाय्यक प्रशिक्षक डोशेट पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना सांगितले. मला वाटते शेवटच्या कसोटी सामन्यात आम्हाला आमची फलंदाजी मजबूत करायची होती. असं ही तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “पहिल्या कसोटी सामन्यात नितीश कुमार रेड्डीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला. या क्षणी सर्वोत्तम फिरकी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूसोबत जाऊ असे आम्हाला वाटले. आम्हाला वाटते की या परिस्थितीत अश्विनला विकेट मिळण्याची अधिक शक्यता आहे. तसेच जेव्हा तुम्हाला नितीश सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल आत्मविश्वास वाटतो, तेव्हा आठव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करतो याने फारसा फरक पडत नाही. या विकेटवर अश्विन जरा जास्त प्रभावी ठरेल असे आम्हाला वाटते. ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा फक्त 94 धावांनी मागे आहे आणि नऊ विकेट शिल्लक आहेत. पर्थच्या कामगिरीवरून भारताला खूप आत्मविश्वास आहे, की ते सामना नक्कीच आपल्या पारड्यात फिरवतील”. असा अंंदाजही त्याने व्यक्त केला.
हेही वाचा-
Under 19 Asia Cup: फायनलमध्ये भारत बांग्लादेश आमने-सामने, या दिवशी रंगणार महामुकाबला
संघाला धक्का..! दुस-या कसोटी दरम्यान संघाच्या प्रशिक्षकानं दिला राजीनामा
भारतीय संघ गुलाबी चेंडूने चमकदार कामगिरी करण्यात अयशस्वी! दिग्गजाची निराशाजनक प्रतिक्रिया






