---Advertisement---

Under 19 Asia Cup: फायनलमध्ये भारत बांग्लादेश आमने-सामने, या दिवशी रंगणार महामुकाबला

On: शनिवार, डिसेंबर 7, 2024 7:40 AM
---Advertisement---

एसीसी अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश मिळवला. तसेच फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. अशी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण बांग्लादेशने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. बांग्लादेशने गेल्या वेळी 2023 मध्ये यूएईचा पराभव करून अंडर 19 आशिया चषक जिंकला होता. आता सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा हिरो ठरला होता. दुस-या उपांत्य फेरीत त्याच्या झंझावाती खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा 170 चेंडू राखून सात गडी राखून पराभव केला. या विजयासह संघाने अंतिम फेरीत धडक मारली. या डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या 36 चेंडूत 67 धावांची तुफानी खेळी केली. सूर्यवंशीने श्रीलंकेविरुद्धचे अर्धशतक अवघ्या 24 चेंडूंमध्ये पूर्ण केले. ज्यात त्याने सहा चौकार आणि पाच षटकार ठोकले.

अलीकडेच वैभवला राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले. ज्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सामील होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या 47 षटकांत 173 धावांवर रोखले आणि त्यानंतर 3 गडी गमावून 23.2 षटकांत 174 धावांचे लक्ष्य गाठले.

एसीसी अंडर-19 आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना उद्या 8 डिसेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार विजेतेपदाचा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तर थेट प्रवाह सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अंतिम फेरीत भारतीय संघ 9व्यांदा विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरेल.

हेही वाचा-

संघाला धक्का..! दुस-या कसोटी दरम्यान संघाच्या प्रशिक्षकानं दिला राजीनामा
भारतीय संघ गुलाबी चेंडूने चमकदार कामगिरी करण्यात अयशस्वी! दिग्गजाची निराशाजनक प्रतिक्रिया
विराट-राहुलसाठी स्टार्कने आखला होता खास प्लॅन! दिग्गजाचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---