भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 445 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या धाडसी खेळीच्या जोरावर 260 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया चिवट फलंदाजी करून भारताला लक्ष्य देऊ शकेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही आणि पर्थपाठोपाठ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ब्रिस्बेनमध्येही ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा धुव्वा उडवला.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्याने सलामीवीर उस्मान ख्वाजा (8) आणि मार्नस लॅबुशेन (1) यांना स्वस्तात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नॅथनला केवळ 4 धावा करता आल्या. मिचेल मार्श 13 चेंडूत केवळ दोन धावा करू शकला. मागील डावात शतके झळकावणारे ट्रॅव्हिस हेड (17) आणि स्टीव्ह स्मिथ (4) यांनाही काही विशेष करता आले नाही. ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट स्टीव्ह स्मिथच्या रूपाने 33 धावांवर पडली. जी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्यात पाचवी विकेट पडल्यानंतर यजमान संघाची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
याआधी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 38 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. 20 वर्षांनंतर चालू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 40 धावांच्या आत पाच विकेट गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या सामन्यादरम्यान बॅड लाईट आणि पावसामुळे भारतीय डावात अनेकवेळा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारतीय फलंदाज खूपच नाराज दिसले. केएल राहुल आणि जडेजा वगळता सर्व भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे आणि पर्थमध्ये शतक झळकावण्याव्यतिरिक्त सुपरस्टार विराट कोहलीला देखील मालिकेत काही विशेष करता आले नाही.
हेही वाचा-
IND vs AUS; ‘गाबाचा घमंड’ पुन्हा मोडून काढण्यासाठी टीम इंडिया समोर 275 धावांचे लक्ष्य!
कसोटीच्या चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ
जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा वर्ल्ड रेकाॅर्ड, ऑस्ट्रेलियात बनवला हा भीमपराक्रम