---Advertisement---

IND vs AUS: भारताला 32 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी, गोलंदाजांवर मोठी जबाबदारी

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 4:05 PM
---Advertisement---

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना आज 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे खेळवला जात आहे. पर्थ कसोटीप्रमाणे येथेही टीम इंडियाचा पहिला डाव स्वस्तात बाद झाला. नितीश रेड्डीच्या 42 धावांच्या लढाऊ खेळीमुळे भारतीय संघ स्कोअरबोर्डवर 180 धावा करण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, भारताला गोलंदाजी करताना ऐतिहासिक कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, भारताने ॲडलेडमध्ये कोणत्याही संघाने बनवलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. 2020 मध्ये टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑलआऊट झाली होती. तर या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सर्वात कमी धावसंख्या 82 आहे. वेस्ट इंडिजने हा परक्रम केला होता.

ॲडलेडच्या मैदानावर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या 145 धावांची आहे. 1992 साली मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी मालिकेतील चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात कांगारूंचा संघ अवघ्या 145 धावांत आटोपला होता. आता भारताला पर्थ कसोटीप्रमाणे पुन्हा ऑस्ट्रेलियन डाव स्वस्तात गुंडाळण्याची संधी आहे. यजमान ऑस्ट्रेलिया 145 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला तर टीम इंडिया 32 वर्षे जुना विक्रम मोडीत काढू शकते.

सध्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघ केवळ 150 धावांवरच गारद झाला होता. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ 104 धावांवर गारद झाला होता. जो की टीम इंडियाने हा सामना 295 धावांनी जिंकला होता. तसेच हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की ॲडलेडमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया केवळ एकदाच 100 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळे त्यांना 100 धावांवर ऑल आऊट करणे भारतीय गोलंदाजांसाठी खूप कठीण काम असेल.

हेही वाचा-

IND VS AUS; “गुडनाईट रोहित शर्मा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने हिटमॅनला डिवचले
भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---