भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेला आजपाासून (19 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. ज्यामधील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच गिल आणि कंपनी पहिल्या डावात फलंदाजी करत आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली 7 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करत आहेत. ज्यामुळे ही मालिका खास असणार आहे. शिवाय शुबमन गिल पहिल्यांदाच वनडे संघाचे कर्णधारपद भुषवत आहे. रोहित शर्माच्या जागी त्याची वर्णी लागली आहे.
या सामन्यात अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी डेब्यू करत आहे. रोहित शर्माच्या हस्ते वनडे कॅप मिळाला.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया; ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग






