मेलबर्न कसोटीत नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यात तर यश आलेच पण या दोघांनीही ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. टी-ब्रेकपर्यंत रेड्डी आणि सुंदर या दोघांच्या बळावर भारताने 7 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये 105 धावांची शतकी भागीदारी आहे. भारताची ऑस्ट्रेलियात 8व्या विकेटसाठीची ही तिसरी शतकी भागीदारी आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगने 2008 मध्ये ही कामगिरी केली होती आणि याच मालिकेत हरभजन सिंगने अनिल कुंबळेसोबत ही कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियात 8व्या विकेटसाठी भारतीयांकडून सर्वाधिक भागीदारीचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगच्या नावावर आहे. या दोघांनी 2008 मध्ये 129 धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियात 8व्या विकेटसाठी भारतीयांची सर्वोच्च भागीदारी-
सचिन तेंडुलकर/हरभजन सिंग- 129
हरभजन सिंग/अनिल कुंबळे- 107
नितीश रेड्डी/वॉशिंग्टन सुंदर – 105*
मेलबर्न कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, एकेकाळी ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांसमोर भारताने 221 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, आकाशदीप, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर या दोन युवा फलंदाजांनी भारतीय संघाला सावरलं आणि सामन्यात भारताचे कमबॅक केले आहे. या जोडीने आतापर्यंत 105 धावांची भागीदारी केली आहे. अश्या परिस्थीत या दोघांना भारतीय संघाला किमान 400 धावापर्यंत पोहचवण्याचे आव्हान असणार आहे. जर या जोडीने असे केल्यास ते ऑस्ट्रेलियात 8व्या विकेटसाठी भारतीयांची सर्वोच्च भागीदाराचा विक्रम रचतील.
हेही वाचा-
IND vs AUS: नितीश कुमार रेड्डीने रचला इतिहास, असा विक्रम करणारा पहिला भारतीय
नितीश रेड्डी आणि अंपायरने डोक्यावर कोणता स्प्रे मारला? नक्की काय होतं कारण?
नितीशकुमार रेड्डीचे ‘पुष्पा’ सेलीब्रेशन, अर्धशतक ठोकताच दाखवला ‘फायर’ अंदाज, पाहा VIDEO