भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला गेला होता. 1 ते 5 मार्चदरम्यान होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अवघ्या तीन दिवसातच संपला होता. तसेच, पहिल्या दिवसापासूनच विकेट्सची पडझड सुरू झाली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 9 विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यातील खेळपट्टीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. यानंतर आयसीसीकडून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानुसार होळकर स्टेडिअमच्या खेळपट्टीला खराब रेटिंग दिली होती. तसेच, मैदानाला तीन डिमेरिट गुणही मिळाले होते, जे पुढील पाच वर्षांपर्यंत कायम असतील.
आता भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने म्हणजेच बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी खेळपट्टीच्या रेटिंगचा रिव्ह्यू करण्यासाठी आयसीसीला पत्र पाठवले आहे.
तीन दिवसातच संंपलेला कसोटी सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Austrlia) संघातील तिसरा कसोटी सामना तीन दिवसाच्या आतच संपला होता. यामध्ये भारताला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 9 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. नियमानुसार, जेव्हा कोणत्याही मैदानावर पाच डिमेरिट गुण होतात, तेव्हा त्या खेळपट्टीला 12 महिन्यांसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या आयोजनावरून निलंबित केले जाते. तसेच, 10 गुण असतील, तर 24 महिन्यांसाठी निलंबित केले जाते.
घाईगडबडीत दिली गेली रेटिंग
माध्यमांतील वृत्तांनुसार, अपील ही नेहमीच केली जाते, कारण असे वाटते की, रेटिंग घाईगडबडीत दिली गेलीये. खेळपट्टीवर सामनाधिकाऱ्याचा निर्णय कसोटी सामना संपण्याच्या काही तासांपूर्वीच आला, जे आयसीसीने घेतलेल्या अशा प्रकरणातील असामान्य होता. बीसीसीआय अधिकाऱ्यांनुसार, पुन्हा समीक्षा केली जाऊ शकते. शक्य झाले, तर निकाल सरासरीपेक्षा कमी केला जाऊ शकतो. आयसीसीची दोन सदस्यीय समिती आता बीसीसीआयच्या आक्षेपावर लक्ष देणार आहे.
बदलावा लागलेला रावळपिंडी खेळपट्टीबाबतचा निर्णय
आयसीसी यापूर्वीही अशा प्रकरणावर पुनर्विचार करत आली आहे. नुकतेच आयसीसीने रावळपिंडी खेळपट्टीबाबतचा आपला निर्णय रद्द केला होता, जो सुरुवातीला ‘सरासरीपेक्षा कमी’ घोषित करण्यात आला होता. तसेच, एक डिमेरिट गुण दिला गेला होता. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अपीलनंतर आयसीसीने त्यांची रेटिंग पुन्हा मागे घेतली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद कसोटीचे यजमानपद साकारणाऱ्या स्टेडिअमबाबतचा निर्णय मागे घेतला होता.
सौरव गांगुली क्रिकेट समितीचे अध्यक्ष
बीसीसीआयच्या अपीलनंतर आयसीसीच्या जनरल मॅनेजरची दोन सदस्यीय समिती आणि क्रिकेट समितीचे अध्यक्ष सामनाधिकाऱ्यांच्या आकलनाची समीक्षा करतील. सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे. तसेच, पीसीबीचे माजी सीईओ वसीम खान जनरल मॅनेजर आहेत. अशात, बीसीसीआयचा या निर्णयाला विरोध असल्यामुळे हे प्रकरण हाताळण्यासाठी गांगुलीच्या ऐवजी दुसरा अधिकारी असू शकतो. अपील मिळाल्याच्या 14 दिवसांमध्ये आयसीसीला अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. अशात काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (ind vs aus border-gavaskar trophy 2023 bcci appeals to icc against poor rating for indore pitch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल
मोठी बातमी । भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव स्मिथ बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!






