---Advertisement---

‘मी विचारच केला नव्हता…’, सलग दुसऱ्या वनडेत कांगारूंना ठेचल्यानंतर कॅप्टन राहुलचे हैराण करणारे विधान

On: सोमवार, सप्टेंबर 25, 2023 10:00 AM
Team-India
---Advertisement---

केएल राहुल याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाचा दारुण पराभव केला. रविवारी (दि. 24 सप्टेंबर) इंदोरमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांनी नमवले. या विजयामुळे भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार केएल राहुल याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी खेळाडूंचेही कौतुक केले.

ईडन गार्डन्सवर वाईट घटना होऊनही बनले क्रिकेटपटूंचे आवडते स्टेडियम ! । ICC Cricket World Cup 2023

काय म्हणाला राहुल?
सामना जिंकल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) म्हणाला, “मी आज पहिल्यांदा जेव्हा खेळपट्टी पाहिली होती, तेव्हा वाटले नव्हते की, खेळपट्टीतून एवढे वळण (स्पिन) मिळेल. तरीही आमच्या संघात काही चांगले फिरकीपटू आहेत. एवढे खेळाडू चांगले खेळत आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला निवडायचे, हा निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधाराला घ्यायचा आहे. मात्र, हे आमच्यासाठी चांगले आहे की, प्रत्येक खेळाडू आपली भूमिका समजून चांगली कामगिरी करत आहे.”

खराब क्षेत्ररक्षणावर दिले मजेशीर उत्तर
राहुलने पुढे बोलताना म्हटले की, “आम्ही आजच्या सामन्यात काही झेल सोडले, हे चांगले नाहीये. मात्र, जेव्हा तुम्ही प्रत्येक दुसऱ्या दिवशी प्रवास कराल आणि अशाप्रकारच्या परिस्थितीत खेळाल, तेव्हा हे कठीण होते. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ताजेतवाने राहणे गरजेचे आहे आणि आम्ही सातत्याने आपल्या शरीराला ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न करू. पुढील सामन्यात आमचे सर्व वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. त्यांना सामना खेळण्याची वेळ मिळेल. 50 षटकांपर्यंत मैदानात उभे राहणे गजरेचे आहे. जेणेकरून तुम्हाला याची सवय होईल.”

https://twitter.com/BCCI/status/1705991242742730756

सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (105) आणि शुबमन गिल (104) यांच्या शतकाच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 399 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी 33 षटकात 317 धावांचे आव्हान मिळाले.

भलेमोठे आव्हान दिल्यानंतर भारतीय संघाने विरोधी संघाला 28.2 षटकात 217 धावांवर रोखले. प्रसिद्ध कृष्णा याने भारताला सुरुवातीला विकेट मिळवून दिले. त्यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट खिशात घातल्या. कृष्णाने 2, तर मोहम्मद शमी याने 1 विकेट घेतली. (ind vs aus captain kl rahul statement on indore pitch after win series against australia)

महत्त्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! 44 वर्षीय इम्रान ताहिरने आपल्या संघाला बनवले CPL Champions, पोलार्डसेनेचा 9 विकेट्सने पराभव
फलंदाजांनी चोपलं गोलंदाजांनी रोखलं! इंदोर वनडेत ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाचा मालिकाविजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---