---Advertisement---

“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. मात्र भारतीय संघाने पहिल्या डावात खराब कामगिरी केली होती. त्यामुळे बर्‍याच दिग्गजांनी चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर टीका केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग आणि ऍलन बॉर्डर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी यात उडी घेतली आहे. त्यांनी या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय संघाने तिसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा केल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून बर्‍याच दिग्गजांनी भारताच्या फलंदाजीवर टीका केली. यामध्ये प्रामुख्याने भारतीय संघाचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजारा लक्ष्य केले जात आहे. या डावात चेतेश्वर पुजाराने 176 चेंडूचा सामना करताना 50 धावांची संथ खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू रिकी पाँटिंग आणि ऍलन बॉर्डर यांनी टीका केली. या दोघांचे म्हणणे आहे की, भारतीय संघाच्या खराब कामगिरीसाठी पुजाराची संथ खेळी कारणीभूत आहे. त्यांच्या संथ खेळीमुळे इतर खेळाडूंवर दबाव निर्माण झाला.

चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर रिकी पाँटिंगला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पाँटिंग म्हणाला, “मला नाही वाटत ही योग्य पद्धत आहे. मला वाटतंय पुजाराने धावा काढण्याची गती वाढवायला हवी. मला वाटतंय त्याच्यामुळे दुसर्‍या फलंदाजांवर जास्त दबाव वाढत आहे.”

पुजाराच्या फलंदाजीवर रिकी पाँटिंगला मोहम्मद कैफने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने ट्विट केले आहे, “काय भारताला वेगाने फलंदाजी करण्याची गरज होती की, डाव समाप्त घोषित करण्याची गरज होती. पुजारा 9 महिन्यांनंतर क्रिकेट खेळत आहे. थोडं मन मोठं ठेवा. कृपया संथ फलंदाजीची चर्चा करू नका. लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे. हा कोणता वनडे किंवा टी-20 सामना नाही. ज्यामध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये वेगाने फलंदाजी करण्याची गरज असावी. ” मोहम्मद कैफ आणि रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाचे माजी खेळाडू बॉर्डर यांनी सुद्धा पुजारावर टीका करताना म्हणाले, “तो चेंडू फटकावताना घाबरत असल्याचे दिसत आहे, नाही का? तो धावा काढण्यापेक्षा आपली विकेट वाचवण्यासाठी खेळत आहे.” परंतु ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी म्हणाले, “पुजारा आपला स्वाभाविक खेळ खेळत आहे. संथ खेळी त्याची शैली आहे. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे आहे की, तो अतिरिक्त सतर्कता बाळगून खेळत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके

‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका

आपलेच दात, आपलेच ओठ! अश्विनच्या गोलंदाजीवर संघ सहकाऱ्यांनी सोडलेत तब्बल ‘इतके’ झेल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---