भारतीय क्रिकेट संघाकडून नागपूर कसोटी येथे दोन खेळाडूंनी दमदार पदार्पण केले. ते दोन खेळाडू इतर कुणी नसून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत हे आहेत. विशेष म्हणजे, सूर्यकुमारने यापूर्वीच टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले आहे. मात्र, कसोटीत पदार्पण करण्याची संधी त्याला आता मिळाली. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी पदार्पणाची टोपी दिली. विशेष म्हणजे, यासह त्याच्या नावावर खास विक्रमही नोंदवला गेला.
तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 14 मार्च, 2021मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 18 जुलै, 2021मध्ये वनडे पदार्पण केले. त्यानंतर आता गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) कसोटीतही त्याने पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव हा असा पहिलाच भारतीय खेळाडू बनला आहे, ज्याने 30 वर्षांच्या वयानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण केले आहे. त्याचे पदार्पण उशिरा झाले, परंतु त्याने कमी काळात स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे.
Test debuts for @surya_14kumar & @KonaBharat 👏 👏
The grin on the faces of their family members says it all 😊 😊#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/dJc7uYbhGc
— BCCI (@BCCI) February 9, 2023
इतर खेळाडूंसाठी प्रेरणा
ज्यावेळी सूर्यकुमारने टी20 पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय 30 वर्षे आणि 181 दिवस इतके होते. त्यानंतर वनडेमध्ये 18 जुलै रोजी त्याचे पदार्पण झाले, त्यावेळी त्याचे वय 30 वर्षे 307 दिवस इतके होते. त्यानंतर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सूर्यकुमार 9 फेब्रुवारी, 2023मध्ये त्याचे वय 32 वर्षे आणि 148 दिवस इतके आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला इतक्या उशिरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करू शकला नाहीये. अशात सूर्यकुमार हा इतर खेळाडूंसाठी एक मोठी प्रेरणा म्हणून पुढे आला आहे. अनेक खेळाडू उशिरा पदार्पण करतात, पण कारकीर्द पुढे घेऊन जाण्यात अपयशी ठरतात. मात्र, सूर्यकुमारने दाखवून दिले आहे की, प्रतीक्षा केल्यानंतर फळ हे मिळतंच. मात्र, यादरम्यान तुम्हाला मेहनत आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करण्याची गरज असते.
ऑस्ट्रेलिया 177 धावांवर सर्वबाद
भारतीय संघाचा आणखी एक यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याने पदार्पण केले. त्याचे वय 29 वर्षे आहे. सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय भारतीय खेळाडूंनी चुकीचा ठरवला. कारण, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकी नऊ आणत 8 विकेट्स घेतल्या. त्यातील 3 विकेट्स अश्विनने, तर 5 विकेट्स जडेजाने घेतल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 67.5 षटकात 177 धावांवर संपुष्टात आला. यावेळी त्यांच्याकडून मार्नस लॅब्युशेन याने 49 धावा केल्या. दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथने 31 आणि ऍलेक्स कॅरी याने 36 धावांचे योगदान दिले. (ind vs aus cricketer suryakumar yadav becomes first indian player to make all three format debut after 30 age)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फेल राहुल! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटीतही राहुलच्या बॅटमधून आटल्या धावा, पहिल्या डावात अपयशी
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी