आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत विक्रमी सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने शतक ठोकले. अशात भारताचा दिग्गज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने ऑस्ट्रेलियाच्या विजयाविषयी मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाला सेहवाग?
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयानंतर व्यक्त झाला. त्याने विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले. त्याने एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरून लिहिले की, “विश्वचषक विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे खूप खूप अभिनंदन. अंतिम सामन्यात ते सर्वोत्तम संघ होते. ट्रेविस हेड खूपच अविश्वसनीय होता. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होता. ऑस्ट्रेलियासाठी उपांत्य सामना जिंकला आणि वर्ल्डकप फायनलमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळली आणि सामना संपवला.”
ट्रेविस हेडला बाहेर न करण्याचा निर्णय योग्य
सेहवागने ट्रेविस हेड (Travis Head) याच्याविषयी पुढे लिहिले की, “दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी ट्रेविस हेड खेळू शकला नाही, तरीही त्याला संघात ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय सर्वोच्च होता. आमच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत जे प्रयत्न केले, त्यासाठी आम्ही आमची मान तातठ ठेवू शकतो. त्यांनी संपूर्ण विश्वचषकात आमच्यासाठी आनंदाचे क्षण दिले, पण दुर्दैवाने ते अंतिम सामना जिंकू शकले नाहीत.”
Many Congratulations Australia on winning the World Cup. They were the best side on the day of the finals. Travis Head was simply unbelievable,was the POTM in WTC finals,won the semis for Aus and played one of the best ever innings in a WC Final and finished the game.
Australia's…— Virender Sehwag (@virendersehwag) November 19, 2023
लॅब्युशेनसोबत शानदार भागीदारी
खरं तर, भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त 240 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यावेळी स्टार्कने 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 137 धावा केल्या. त्याने मार्नस लॅब्युशेन याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 192 धावांची शानदार भागीदारी रचली. (ind vs aus final former cricketer virendra sehwag explain why australia win the icc odi world cup travis head)
हेही वाचा-
नीरजचा अपमान! WC Finalमध्ये टीव्हीवर दिसला नाही ‘चॅम्पियन’; नेटकरी म्हणाले, ‘कॅमेरामनने बॉलिवूडचे गुटखा…’
INDvsAUS: T20 मालिकेतून डच्चू मिळाल्यानंतर चहलची पहिली रिऍक्शन आली समोर, पाहून तुम्हालाही वाटेल वाईट