सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. टीम इंडिया गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, यावेळी कांगारू बदला घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर संघाला या चार बदल करावे लागतील.
अभिमन्यू ईश्वरनच्या जागी साई सुदर्शन
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी युवा खेळाडू अभिमन्यू ईश्वरन हा राखीव सलामीवीर म्हणून टीम इंडियाचा भाग आहे. अभिमन्यू ईश्वरन देखील भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळला होता. पण त्याला विशेष काही करता आले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी साई सुदर्शनला संधी देणे अधिक योग्य ठरू शकते.
मोहम्मद शमीचे पुनरागमन
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने दमदार पुनरागमन केले आहे. शमी 360 दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आणि त्याने सात विकेट घेतल्या. रणजी ट्रॉफीमध्ये तो बंगालकडून मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता. भारताला ऑस्ट्रेलियात पुन्हा मालिका जिंकायची असेल तर शमीला संघात परत आणावे लागेल.
रोहित शर्माला पहिली कसोटी खेळावी लागेल
कर्णधार रोहित शर्मा 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणारा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. मात्र, 15 नोव्हेंबरलाच रोहित दुसऱ्यांदा वडील झाला आहे. अशा परिस्थितीत तो 18 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. जर भारताला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकायची असेल, तर रोहितला पाचही कसोटी सामने खेळावे लागतील, कारण त्याच्या अनुपस्थितीत संघाचा समतोल बिघडू शकतो.
योग्य सलामी फलंदाजी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणि गरज पडल्यास केएल राहुलला डावाची सलामी दिली जाईल, असे वृत्त आहे. राहुल हा टॉप ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज असला, आणि त्याने भारतासाठी आधीच सलामी दिली असली, तरी आता राहुल बऱ्याच दिवसांपासून मधल्या फळीत खेळत आहे. अशा स्थितीत भारताला मालिका जिंकायची असेल तर त्याचा वापर योग्य क्रमांकावर करावे.
हेही वाचा-
26 चौकार, 205 धावा, लखनऊ सुपरजायंट्सच्या या खेळाडूची रणजी ट्रॉफीत द्विशतकी खेळी
बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत या दोन गोलंदाजांमध्ये रंगणार विशेष लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात
IND vs AUS; टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, सरावासाठी पुन्हा मैदानात उतरला स्टार फलंदाज