भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या ठिकाणी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत वनडे आणि टी20 मालिकेनंतर आता चार सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर’ कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळला जाणार आहे. परंतु दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून सलामीला कोण येणार हे अजून स्पष्ट झाले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यावेळी महत्त्वाचा सल्ला देत कामचलाऊ फलंदाज सलामीला येवू शकतो, असे म्हटले आहे.
पाचव्या क्रमांकाच्यावर वेडने कधी ही फलंदाजी केली नाही
माध्यमांशी बोलताना क्लार्क म्हणाला, “कैमरॉन ग्रीनची निवड केली, तर वेडसाठी इतर जागा शोधावी लागेल. तो प्लेईंग इलेव्हनमध्ये असायला हवा. फलंदाजाचा क्रमांक कोणताही असो, गरज पडल्यानंतर त्याच्याकडून सलामीलासुद्धा फलंदाजी करता येवू शकते.”
वेडने भारतीय संघाविरुद्ध शेवटच्या दोन टी20 सामन्यात अर्धशतके ठोकली होती. ऑस्ट्रेलियासाठी त्याने पाचव्या क्रमांकावर कधीही फलंदाजी केलेली नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात डेविड वॉर्नर राहणार अनुपस्थित
ऑस्ट्रेलियासमोर संकट निर्माण झाले आहे, कारण डेविड वॉर्नर दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यात अनुपस्थित असणार आहे. सोबतच विल पुकोव्हस्कीला डोक्याला चेंडू लागून दुखापत झाली आहे, तर जो बर्न्सही फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे वॉर्नरच्या जागी कोण सलामीला येणार हा प्रश्न ऑस्ट्रेलिया समोर उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC Ranking: वनडे मालिकेतील शानदार कामगिरीने हार्दिक पंड्याला फायदा, तर रोहित ‘या’ क्रमांकावर
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात