जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यामुळे टीम इंडियाने अलीकडच्या काळात अनेक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला 5वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा जसप्रीत बुमराह सामन्याच्या मध्यभागी अचानक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर प्रशिक्षण किटमध्ये स्टेडियम सोडताना दिसला. त्यावेळी बुमराहला मैदानावर काही त्रास झाला असावा. अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे तो स्कॅनिंगसाठी बाहेर पडला आहे. तो टीम इंडियाच्या वैद्यकीय पथकासोबत दिसला. दरम्यान, टीम इंडियाचा युवा गोलंदाज प्रसिध कृष्णाने बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. परंतु याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसिध कृष्णाला टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेसाठी पाठवण्यात आले. जेव्हा कृष्णाला बुमराहबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर तो म्हणाला की बुमराहला पाठदुखी आहे आणि तो स्कॅन करण्यासाठी गेला होता. स्कॅन अहवालानंतर वैद्यकीय पथक कोणतेही अपडेट देऊ शकेल. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मात्र समोर आलेल्या माहिती समोर असे ही म्हटले जात आहे की, तो फलंदाजी करु शकतो. मात्र गोलंदाजीचा निर्णय त्याला कसे वाटते (त्याला होणारा त्रास) हे तपासूनच घेतले जाईल.
🚨 UPDATE ON JASPRIT BUMRAH. 🚨
– Bumrah should be alright to bat, but the decision on his bowling will be taken tomorrow checking upon how he feels. (Sahil Malhotra). pic.twitter.com/7FJP2DFtBs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
या सामन्यात भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची गरज आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 141 धावा केल्या असून टीम इंडियाकडे सध्या 145 धावांची आघाडी आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला पुढील डावात लक्ष्याचा बचाव करण्यासाठी बुमराहची गरज भासणार आहे, मात्र तो शेवटच्या डावात गोलंदाजी करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या संपूर्ण मालिकेत बुमराहची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. त्याने 09 डावात एकूण 32 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याची उपस्थिती टीम इंडियासाठी आवश्यक आहे.
हेही वाचा-
सिडनी कसोटीत रिषभ पंतचा जलवा! एकाच खेळीत मोडले कपिल-गंभीरचे मोठे रेकॉर्ड
रिषभ पंतचे अर्धशतक, स्कॉट बोलंडचा कहर, सिडनी कसोटीचा दुसरा दिवस आंबट-गोड
कसोटीत टी20 खेळी..! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पंतनं धो धो धुतलं, रचला ‘विराट’ विक्रम