भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने मार्नस लाबुशेनची विकेट घेत इतिहास रचला आहे. तो ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने बिशन बेदीला मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराहसाठी ही मालिका आतापर्यंत चांगली ठरली आहे. या मालिकेत त्याने तीन वेळा 5 विकेट हाॅल घेण्यासोबतच 32 विकेट्स घेतल्या आहेत.
या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय गोलंदाजाने एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बिशन बेदीच्या नावावर होता, ज्यांनी 1977/78 मध्ये 31 विकेट घेतल्या होत्या. परंतु आता बुमराहने लॅबुशेनच्या विकेटसह त्याचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. बुमराहने उस्मान ख्वाजाला लाबुशेनआधी बाद केले होते.
ऑस्ट्रेलियातील एका मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स
32 विकेट- जसप्रीत बुमराह 2024/25 मध्ये
31 विकेट- बिशन बेदी 1977/78 मध्ये
28 विकेट- बीएस चंद्रशेखर 1977/78 मध्ये
25 विकेट- ईएएस प्रसन्ना 1967/68 मध्ये
25 विकेट – कपिल देव 1991/92 मध्ये
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ अवघ्या 185 धावांवर आटोपला. रोहित शर्मा हा कसोटी सामना खेळत नसल्याने त्याने बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवर गवत असतानाही बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या बातमीखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
IND vs AUS; कांगारू फलंदाजांना जसप्रीत बुमराहची भिती, अष्टपैलू खेळाडू स्पष्टच बोलला
IND vs AUS; रोहित शर्माची निवृत्ती फिक्स? निवडकर्त्यांनी स्पष्टच सांगितले
3 खेळाडू जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची जागा घेऊ शकतात, मराठमोळ्या ऋतुराजकडे मोठी संधी