भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी करू शकतो. सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या सामन्यात बुमराहला द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. लेगस्पिनर बीएस चंद्रशेखरने 1972-73 मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांमध्ये 35 बळी घेतले.
हा विक्रम मोडण्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फक्त 6 विकेट्सची गरज आहे. परदेशात द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा बिशन सिंग बेदीचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला आणखी दोन विकेट्सची गरज आहे. बुमराहने तीन विकेट घेतल्यास, तो द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेण्याचा कपिल देवचा विक्रम मोडेल. कपिलने 1979-80 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या.
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 30 बळी घेतले आहेत आणि 44व्या सामन्यात 200 कसोटी बळी घेणारा तो सर्वात तरुण भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत त्याने घेतलेल्या सहा विकेट्समुळे बुमराहने गोलंदाजी क्रमवारीत 15 रेटिंग गुणांची झेप घेत 907 रेटिंग गुण मिळवून एक नवीन भारतीय विक्रम केला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीनुसार, बुमराहने नुकताच निवृत्त झालेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या 2016 मधील सर्वोच्च 904 गुणांना मागे टाकून हा विक्रम केला आहे.
पाच सामन्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे. मेलबर्न येथे खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 184 धावांनी हरवले. त्यापूर्वी पर्थ कसोटीत टीम इंडियाने विजयी सुरुवात केली होती. पण दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करत भारताला 10 विकेट्सनी नमवले. तर तिसरा कसोटी अनिर्णीत राहिलेला. अश्या स्थितीत भारताला ट्राॅफी राखायचे असेल सिडनी कसोटी सामना जिंकणे गरजेचे आहे.
हेही वाचा-
धक्कादायक बातमी लीक! गौतम गंभीर नाही, हा दिग्गज खेळाडू होता मुख्य प्रशिक्षकपदासाठी पहिली पसंती
भारतीय संघात मतभेद! रोहित शर्माच्या कर्णधारपदावर या वरिष्ठ खेळाडूचा डोळा
रुग्णालयातून घरी परतला विनोद कांबळी, चाहत्यांना केलं दारू न पिण्याचं आवाहन