भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि जयमान भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मागच्या काही महिन्यांपासून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांमुळे संघ व्यवस्थापनापुढे प्लेइंग इलेव्हनचा पेच तयार झाला होता. पण मंगळवारी अखेर पंतला बाहेर बसवून कार्तिकने अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान बनवले.
आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाशी जोडला गेला आणि जबरद्सत प्रदर्शन देखील केले. आयपीएल हंगाम संपल्यानंतर कार्तिकने मोठ्या काळानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आणि संघाने दाखवलेल्या विश्वासास पात्र देखील ठरला. त्याने मागच्या काही महिन्यांमध्ये संघासाठी एका उत्कृष्ट फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. दुसरीकडे रिषभ पंत (Rishabh Pant) भारतासाठी कसोटी आणि एखदिवसीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असला, तरी टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आली नाहीये.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कार्तिकच्या चाहत्यांच्या मनाप्रामाणे गोष्टी घडल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून ही मागणी जोर धरत होती की, पंतला प्लेइंग इळेव्हनमधून बाहेर बसवून कार्तिकला संधी मिळावी. अनेकांच्या मते पत भविष्यात मोठ्या काळापर्यंत भारतासाठी खेळू शकतो, पण कार्तिकच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाहीये. अशात 37 वर्षीय कार्तिकला संधी मिळाल्यामुळे चाहत्यांना देखील समाधान मिळाले आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युझवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन)-
ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर कार्तिकच इन! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पंतला नाही मिळाली संधी
अखेर आयर्लंडने जाहीर केला विश्वचषकासाठी संघ; हे टी20 स्टार संघात सामील; वेस्ट इंडिजला धोका






