---Advertisement---

कुलदीपच्या गळाला मोठा मासा! मॅक्सवेलचा त्रिफळा उडवल्यानंतर ऑस्ट्रेलिया पूर्णपण अडचणीत

Glenn Maxwell
---Advertisement---

रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय गोलंदाजांनी मैदानात वर्चस्व केले. विश्वचषक 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. पहिल्या सहा विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याचीही विकेट कुलदीप यादवने स्वस्तात घेतली. कुलदीपच्या फिरीकने अष्ट्रपैलूचा लेग स्टंप हवेत उडाला.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 36व्या षटकात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गोलंदाजी करत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याल कुलदीपचा फिरकी चेंडू खेळता आला नाही, जो थेट स्टंप्समध्ये घुसला. मॅक्सवेल 15 धावांवर खेळत असताना कुलदीपने त्याचा त्रिफळा उडवला. सामन्यातील कुलदीपची ही दुसरी विकेट ठरली. कुलदीपने पहिली विकेट डेव्हिड वॉर्नर याची घेतली. वॉर्नर वैयक्तिक 41 धावांची खेळी करून कुलदीपच्या हातात झेलबाद झाला होता.

मॅक्सवेलच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 विकेट्सच्या नुकसानावर 140 झाली. त्तपूर्वी या सामन्यात एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नव्हता. स्टीव स्मिथ याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. (IND vs AUS Kuldeep Yadav cleans up Maxwell for 15 )

https://www.instagram.com/reel/CyIvGc3v8o5/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड

महत्वाच्या बातम्या – 
जडेजाच्या फिरकीपुढे स्मिथ निरुत्तर! पाहा कसा उडवला दिग्गजाचा त्रिफळा 
जड्डू चमकला रे! एकाच ओव्हरमध्ये 2 कांगारू फलंदाजांना केलं चालतं, भारतीय संघ मजबूत स्थितीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---