मेलबर्न। शनिवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस असून भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक केले आहे. तसेच भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ९१.३ षटकात २७७ धावा केल्या आहेत.
रहाणेने तिसऱ्या सत्रात जडेजाला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. या दोघांनी ८१ ते ८५ या ५ षटकात काहीसे आक्रमक खेळताना २४ धावा काढल्या. दरम्यान ८१ व्या षटकात रहाणेचा झेल स्टिव्ह स्मिथकडून सुटला त्यामुळे रहाणेला ७३ धावांवर जीवदान मिळाले. ८६ आणि ८७ व्या षटकात रहाणे आणि जडेजाने पळून धावा काढण्यावर जोर दिला आणि या दोन षटकात ८ धावा वसून केला.
त्यानंतर रहाणेने ८८ व्या षटकात कमिन्सला चौकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने १९५ चेंडूत त्याचे कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक केले. शतक पूर्ण झाल्यानंतर रहाणे थोडा खुलून खेळताना दिसला. त्याने ८९ व्या षटकात एक चौकार ठोकत जडेजासह ५ धावा काढल्या. ९० आणि ९१व्या षटकात मिळून या दोघांना ३ धावाच करता आल्या. तसेच ९२ व्या षटकात पुन्हा एकदा रहाणेला जीवदान मिळाले. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याचा झेल ट्रेविस हेडने सोडला. हा झेल खरंतर हेडने बरोबर पकडला होता मात्र झेल घेतल्यानंतर जमिनीवर पडताना त्याच्या हातून चेंडू निसटला आणि रहाणेची विकेट वाचली.
त्यानंतर पाऊस आणि जोराचा वारा सुटल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताने दुसऱ्या दिवसाखेर ९१.३ षटकात ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. सध्या भारत ८२ धावांनी आघाडीवर आहे. तसेच रहाणे १०४ आणि जडेजा ४० धावांवर नाबाद आहे. या दोघांमध्ये ६ व्या विकेटसाठी १०४ धावांची शतकी भागीदारी झाली आहे.
रहाणे-जडेजाची अर्धशतकी भागीदारी
दुसऱ्या सत्राखेर भारताने १८९ धावा केल्यानंतर तिसऱ्या सत्राची सुरुवात रहाणे आणि जडेजाने उत्तम केली. या दोघांनीही काही उत्तम फटके मारले ६४ ते ६७ या ४ षटकात जडेजा आणि रहाणेने एकूण १३ धावा काढल्या. तर हेजलवूडने एक षटक निर्धाव टाकले. पुढच्या ६८ व्या षटकात रहाणेने चौकार वसूल केला. ६९ आणि ७० व्या षटकात मिळून रहाणे आणि जडेजाने एकेरी-दुहेरी धावांच्या मदतीने ६ धावा काढल्या. रहाणे आणि जडेजा या दरम्यान धावफलक हलता ठेवण्यावर भर देत असल्याचे लक्षात येत होते.
तसेच ७० व्या षटकापर्यंत भारताने १३ धावांची आघाडी घेतली होती. ७१ ते ७५ षटकांदरम्यानही रहाणे आणि जडेजामध्ये चांगले सामंजस्य पहायला मिळाले. या दोघांनीही या ५ षटकात १५ धावा काढल्या. तसेच हेजलवूडने ७१ वे षटक निर्धाव टाकले होते. ७६ आणि ७७ व्या षटकात रहाणे आणि जडेजाला केवळ २ धावाच करता आल्या. लायन आणि ग्रीनने त्यांना या दोन षटकात जखडून ठेवले. ७८ वे षटक लायनने निर्धाव टाकले. ७९ व्या षटकात ग्रीनने केवळ ३ धावा दिल्या. तर ८० व्या षटकात रहाणे आणि जडेजाने पळून धावा करण्यावर भर देत एकूण ४ धावा काढल्या.
जडेजा आणि रहाणेमध्ये ८० व्या षटकापर्यंत ६ व्या विकेटसाठी ५९ धावांची नाबाद भागीदारी झाली होती. भारताने ८० षटकात ५ बाद २३२ धावा केल्या असून जडेजा २७ धावांवर आणि रहाणे ७३ धावांवर नाबाद आहे.
दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ६३.३ षटकात ५ बाद १८९ धावा
५० षटकांच्या आत १३४ धावा केल्यानंतर रहाणेने पंतसह भारताचा डाव चोख फलंदाजी करत पुढे नेत होता. ५१ व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर या दोघांना एकच धाव काढता आली. पण ५२ व्या षटकात पंतने आक्रमक खेळ केला. त्याने २ चौकार आणि २ वेळा रहाणेसह दुहेरी धावा काढत कमिन्सच्या गोलंदाजीवर १२ धावा चोपल्या.
पंतने ५३ व्या षटकातही चौकार ठोकत रहाणेसह ६ धावा काढल्या. कमिन्सने ५४ वे षटक निर्धाव टाकले. तर ५५ व्य षटकात रहाणेने ४ धावा काढल्या. ५६ आण ५७ व्या षटकात मिळून एका चौकारासह ९ धावा पंत आणि रहाणेने काढल्या. स्टार्कच्या ५८ व्या षटकात ५ धावा निघाल्या.
पेनने ५९ वे षटकात ग्रीनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने या षटकात केवळ २ धावाच दिल्या. मात्र ६० व्या षटकात पंत आणि रहाणेमधील रंगत चाललेली भागीदारी तोडण्यात मिशेल स्टार्कला यश आले. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंतला यष्टीरक्षक पेनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पंत ४० चेंडूत २९ धावा काढून बाद झाला. पंत आणि रहाणेमध्ये ५ व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी झाली. पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला.
कमिन्सने ६१ वे षटक निर्धाव टाकले. त्यानंतर ६२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रहाणेने चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. त्याने १११ चेंडूत ५ चौकारांसह त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या षटकात ८ धावा निघाल्या.
भारताने ६२ षटकात ५ बाद १८४ धावा केल्या. ६३ व्या षटकात कमिन्सने केवळ १ धाव दिली. पण पुढच्याच षटकात तीन चेंडू झाल्यानंतर पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाल्याने दुसरे सत्र थांबवण्यात आले.
दुसऱ्या सत्राखेरपर्यंत भारताने पहिल्या डावात ६३.३ षटकात ५ बाद १८९ धावा केल्या आहेत. भारत अजून ६ धावांनी ऑस्ट्रेलियापेक्षा पिछाडीवर आहे. सध्या रहाणे ५३ धावांवर आणि जडोजा ४ धावांवर नाबाद खेळत आहे.
रहाणेची संयमी खेळी
पहिल्या सत्रात ९० धावा केल्यानंतर भारताकडून विहारी आणि रहाणेने दुसऱ्या सत्राची चांगली सुरुवात केली होती. पण ३७ ते ४२ षटकात नॅथन लायन आणि जोश हेजलवूडने या दोघांनाही चांगलेच जखडून ठेवले होते. या ५ षटकात विहारी आणि रहाणेला ११ धावा काढण्यात यश आले. ४३ व्या षटकातही हेजलवूडने २ धावाच दिल्या. तर ४३ व्या षटकात लायनविरुद्ध तीन धावा काढण्यात रहाणे आणि विहारीला यश आले.
हेजलवूडने टाकलेल्या ४४ व्या षटकात मात्र रहाणेने खुलून खेळताना चौकार मारत विहारीसह एकूण ७ धावा वसूल केल्या. पण ४५ व्या षटकात नॅथन लायनने पुजाराला बाद करत भारताला चौथा धक्का दिला. त्याने विहारीला स्लीपमध्ये स्टिव्ह स्मिथ कडे झेल देण्यास भाग पाडले. विहारी २१ धावा करुन बाद झाला. त्याने रहाणेसह चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली.
विहारी बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. ४६ व्या षटकात हेजलवूडने केवळ १ धाव दिली. ४७ व्या षटकात मात्र रहाणे आणि पंतने एकेरी-दुहेरी धावा पळत एकूण ५ धावा केल्या. ४८ व्या षटक हेजलवूडने निर्धाव टाकले. ४९ व्या षटकातही रहाणे आणि पंतने एकेरी आणि दुहेरी धावांसह ४ धावा काढल्या. ५० व्या षटकात रहाणेने काही चांगले फटके खेळले. यासह या षटकात एका चौकारासह त्याने ८ धावा काढल्या.
५० षटकानंतर भारताने पहिल्या डावात ४ बाद १३४ धावा केल्या आहेत. रहाणे ३३ धावांवर खेळत असून त्याला ६ धावांवर खेळत असणारा रिषभ पंत साथ देत आहे.
पहिल्या सत्रात भारताच्या ३७ षटकात ३ बाद ९० धावा
भारताने गिलची विकेट गमावल्यानंतर काही वेळातच खेळपट्टीवर स्थिरावलेला पुजाराही बाद झाला. पुजाराला २४ व्या षटकात कमिन्सने यष्टीरक्षक टीम पेन करवी झेलबाद केले. पुजाराने ७० चेंडूत १७ धावा केल्या. गिल आणि पुजारा एका पाठोपाठ एक बाद झाल्याने हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणे ही नवीन जोडी मैदानात उतरली. या दोघांनी संयमी फलंदाजी केली.
ग्रीन, स्टार्क आणि कमिन्सने मिळून २५ ते ३० षटकात ३ षटके निर्धाव टाकत १३ धावा दिल्या. ३१ वे षटक हेजलवूडने निर्धाव टाकले. तर ३२ व्या षटकात मिशेल स्टार्कविरुद्ध विहारी आणि रहाणेला २ धावा करण्यात यश आले. तर ३३ व्या षटकात हेजलवूडने केवळ १ धाव दिली. ३४ व्या षटकात रहाणेने स्टार्कच्या गोलंदाजीवर एक चौकार वसुल केला. ३५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनने फिरकीपटू नॅथन लायनकडे चेंडू सोपवला. लायननेही हे षटक निर्धाव टाकले.
स्टार्कने ३६ वे षटकात २ धावा दिल्या. तर लायनने ३७ व्या षटकात १ धाव दिली.
पहिल्या सत्रात भारताने पहिल्या डावात ३७ षटकात ३ बाद ९० धावा केल्या आहेत. भारताकडून रहाणेने १० धावांवर तर विहारी १२ धावांवर नाबाद खेळत आहे.
गिलचे अर्धशतक थोडक्यात हुकले
रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने १ बाद ३६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. भारताकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेले चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी उतरले.
या दोघांनीही पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला संयम राखत फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. कमिन्सने रविवारी टाकलेले पहिलेच षटक म्हणजेच भारताच्या पहिल्या डावातील १२ वे षटक निर्धाव टाकले. तर १३ वे षटकात हेजलवूडने ४ धावा दिल्या. या षटकात तिसऱ्या चेंडूवर गिलचा झेल यष्टीरक्षक टीम पेनकडून सुटला.
कमिन्सने १४ वे षटक पुन्हा निर्धाव टाकले. मात्र हेजलवूडने टाकलेल्या १५ व्या षटकात तब्बल १० धावा पुजारा आणि गिलने वसूल केल्या. या षटकात गिलने एक चौकार ठोकला तसेच पुजारा आणि गिलने दोनवेळा तीन धावा पळून काढल्या. कमिन्सने टाकलेल्या १६ व्या षटकात २ धावा निघाल्या. तर १७ व्या षटकात मात्र हेजवूडने केवळ १ धाव दिली. १८ वे षटक कमिन्सने तर १९ वे षटक हेजलवूडने पुन्हा निर्धाव टाकले. २० व्या षटकात गिलने एक चौकार वसूल केला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनने २१ व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनकडे चेंडू सोपवला. त्याने या षटकात केवळ २ धावा दिल्या. तर २२ व्या षटकात कमिन्सने पहिल्या ५ चेंडूत केवळ २ धावा दिल्या. पण शेवटच्या षटकात त्याने खेळपट्टीवर स्थिरावत चाललेल्या शुबमन गिलला बाद करत दुसऱ्या दिवसात ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. गिल ६५ चेंडूत ८ चौकारांसह ४५ धावा करुन बाद झाला. त्याचे पहिले कसोटी अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले.
2nd Test. 21.6: WICKET! S Gill (45) is out, c Tim Paine b Pat Cummins, 61/2 https://t.co/HL6BBEW6uY #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 27, 2020
भारताने २२ षटकात २ बाद ६१ धावा केल्या.