भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. याठिकाणी खेळपट्टी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. सामन्यात विराटची विकेट घेताच स्टार्कच्या नावावर मोटा विक्रम नोंदवला गेला.
भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याच्या चेंडूवर विकेट गमावली. स्टार्कने ही विकेट घेताच तो ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला. ऑस्ट्रेलिायचा माजी दिग्गज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) याला मागे टाकत स्टार्कने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम दिवंगत शेन वॉर्न याच्या नावावर आहे. वॉर्नने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी एकूण 999 विकेट्स घेतल्या.
यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी दिग्गज ग्लेन मॅकग्रा आहेत. मॅकग्रांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 948 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रेट ली आहे, ज्याने कारकिर्दीत एकूण 718 विकेट्स घेतल्या. आता या यादीत चौथ्या क्रमांकावर मिचेल स्टार्क पोहोचला आहे. मिचेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे, पण स्टार्कने त्याचा विक्रम मोडला. जॉन्सनने आपल्या कारकिर्दीत 590 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्टार्कने शुक्रवारी तीन विकेट्स घेतल्यानंतर आपल्या 593 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
शेन वॉर्न – 999
ग्लेन मॅकग्रा – 948
ब्रेट ली – 718
मिचेल स्टार्क – 593
मिचेल जॉनसन – 590
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ 35.4 षटकांमध्ये 188 धावा करून विकेट गमावली. सलामीवीर मिचेल मार्शने सर्वाधिक 81 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 16 धावांवर पहिल्या तीन, तर संघाची धावसंख्या 83 असताना 5 विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर सहाव्या विकेटपूर्वी रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी संयमी खेळ दाखवत संघाला विजायाच्या अगदी जवळ नेले. राहुल आणि जडेजा जोडीने 39.5 षटकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला.
(Mitchell Starc joins the list of legendary Australian players)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतकानंतर ईशान किशनची बॅट शांतच, मागच्या 10 डावांमध्ये चाहत्यांची निराशा
सूर्या आणि वनडे समीकरण जुळेना! ‘गोल्डन डक’ होत पदरी पडले आणखी एक अपयश