ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसत आहे. ज्यामागचे मुख्य कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड आहे. ज्यात हेडने जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. त्यामुळे कांगारू संघ मोठ्या 150+ धावांची आघाडी घेतली. हेडने शानदार फलंदाजी करत 141 चेंडूत 140 धावांची खेळी खेळली. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. मात्र, सिराजने त्याला बाद केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि वातावरण चांगलेच तापले. सिराजने हेडला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला.
दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात भारताला गोत्यात आणण्याचे श्रेय ट्रॅव्हिस हेडला जाते. तो फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळाली नव्हती आणि सामन्यावर भारताचे नियंत्रण होते. मात्र येथून हेडने आपल्या परिचित शैलीत फलंदाजी केली. त्याने पहिले आपले अर्धशतक 63 चेंडूत पूर्ण केले आणि त्यानंतर दिवस-रात्र कसोटीत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम 111 चेंडूत केला. जो यापूर्वीही त्याच्या नावावर होता.
A sizeable crowd behind Australia…
A billion behind Siraj ????#AavaDe | #AUSvIND— Gujarat Titans (@gujarat_titans) December 7, 2024
शतकानंतर हेड अधिक आक्रमक मूडमध्ये दिसला आणि मोकळेपणाने मोठे फटके खेळले. भारतीय गोलंदाजांकडे त्याच्या फलंदाजीला उत्तर नसल्याचे दिसत होते. मात्र, नवीन चेंडू येताच कर्णधार रोहित शर्माने आपल्या मुख्य वेगवान गोलंदाजांना दोन्ही बाजूंनी तैनात केले. त्यानंतर सिराजने उत्कृष्ट यॉर्कर टाकून हेडला बोल्ड केले. यानंतर सिराजने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि हेडला ते आवडले नाही. त्यानेही काही शब्द बोलले आणि प्रत्युत्तरात सिराजने त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. बाद होण्यापूर्वी हेडने 141 चेंडूंत 17 चौकार आणि चार षटकारांसह 140 धावा केल्या.
मोहम्मद सिराजने त्याला जीवदान दिले नसते तर ट्रॅव्हिस हेड आपले शतक पूर्ण करू शकला नसता. 68व्या षटकात हेडने आर अश्विनविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत उडाला. सिराजने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि हेडला जीवदान मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने पिंक बॉल कसोटीत तिसरे शतक झळकावले.
हेही वाचा-
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडची झंझावती शतकी खेळी, पिंक बाॅल कसोटीत रचला अनोखा इतिहास!
जो रूटचे खास शतक! द्रविडचा रेकाॅर्ड मोडला, आता नंबर पाॅन्टिंगचा
इंग्लंडने टेस्टमध्ये 5,00,000 धावांचा आकडा गाठला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम






