भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेदरम्यान केवळ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच चुरशीची स्पर्धा होणार नाही, तर भारताचा आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन यांच्यातही विशेष लढत होणार आहे. यावेळी अश्विनचा एक खास विक्रम धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत या दोन गोलंदाजांमध्ये काय टक्कर होणार आहे ते जाणून घेऊया.
टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनने एकट्याने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत अश्विनला ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा सामना करावा लागणार आहे. आर अश्विनच्या नावावर सध्या 105 सामन्यांच्या 199 डावांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 536 विकेट आहेत. तर नॅथन लियॉनने ऑस्ट्रेलियाकडून 129 सामन्यांच्या 242 डावात 530 विकेट घेतल्या आहेत. नॅथन लायन अश्विनला 7 विकेट घेताच मागे सोडू शकतो. मात्र, या मालिकेदरम्यान अश्विनही ॲक्शनमध्ये असणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या सक्रिय गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन सध्या पहिल्या स्थानावर आहे. या यादीत नॅथन लायन दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत नॅथन लायनमुळे अश्विनचा नंबर 1 मुकुट धोक्यात आला आहे. सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन सातव्या स्थानावर आहे. तर लायन 8 व्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये खेळणे अश्विनसाठी खूप अवघड आहे. पण लायन ऑस्ट्रेलियासाठी सर्व सामने खेळू शकतो. अशा स्थितीत अश्विनचा विक्रम आणखी धोक्यात आला आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, सरावासाठी पुन्हा मैदानात उतरला स्टार फलंदाज
WI VS ENG; वेस्ट इंडिजचा शानदार कमबॅक, इंग्लंडचा दारुण पराभव
IND vs AUS: रोहित-शुबमनशिवाय टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार? संघाचं नेतृत्व कोणाकडे?