भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवण्यामध्ये चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. त्याने या मालिकेत 74.43च्या सरासरीने 521 धावा केल्या असून त्यामध्ये 3 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.
पुजाराच्या या खेळीचे भारतीय फलंदाज रोहित शर्माने कौतुक केले आहे.
‘कोणीही पुजाराचे ते तीन विजयी शतके विसरणार नाही’, असे रोहित शर्माने ट्विट करत पुजाराचे कौतुक केले आहे.
रोहितच्या या ट्विटला पुजारानेही आभारी म्हणत आम्हाला जल्लोषावेळी तुझी कमी भासत होती असे उत्तर दिले आहे.
Thank you Rohit! Missed you at the celebrations. Can't wait to meet the little one 😊
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) January 8, 2019
रोहित मुलगी झाल्याचे कळाल्यानंतर 30 डिसेंबरला त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्यासाठी पुन्हा भारतात परतला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका होणार असल्याने पुन्हा रोहित ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराटने जेव्हा ट्राॅफी हातात घेतली तेव्हा मी रडत होतो
–रहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात
–कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले