---Advertisement---

‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!

Ind-vs-Aus
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धची आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकण्यासाठी आतुर आहे. तो म्हणतो की सध्याच्या संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे हे एक अपूर्ण स्वप्न आहे. 2014-15 नंतर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. टीम इंडियाने गेल्या दोन वेळा कांगारूंना त्यांच्याच भूमीवर पराभूत केले आहे. यावेळी भारताला सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करुन विजयाचे हॅट्ट्रीक करायचे आहे, तर भारताचा विजयरथ रोखून मालिका काबीज करण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष असेल.

भारताविरुद्ध चार मालिका खेळलेल्या पॅट कमिन्सने फॉक्स क्रिकेटशी बोलताना सांगितले की, बॉर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकणे हे सध्याच्या पिढीतील बहुतांश खेळाडूंचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहे. तथापि, कर्णधाराला खात्री आहे की त्याचा संघ घरच्या भूमीवर हे काम पूर्ण करू शकेल.

कमिन्स म्हणाला, “ही अशी ट्रॉफी आहे. जी मी यापूर्वी कधीही जिंकलेली नाही. ही अशी ट्रॉफी आहे जी आमच्या गटातील फारसे खेळाडूंनी जिंकलेली नाही. आम्ही गेल्या काही वर्षात कसोटी संघ म्हणून काही उत्कृष्ट गोष्टी केल्या आहेत. घरच्या मैदानांवर ही स्पर्धा होणार असल्याने आम्हाला परिस्थितीचा फायदा होईल. तसेच, भारत एक चांगला संघ आहे. त्यांच्यासोबत आम्ही खूप क्रिकेट खेळले आहे. आणि आम्ही त्यांना खरोखर चांगले ओळखतो. ही मालिका अटीतटीची होणार यामध्ये काही संशय नाही. पण आम्हाला वाटते की, आम्ही खरोखरच चांगल्या स्थितीत आहोत.”

मात्र, गेल्या वर्षी भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता, तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला भारताचा पराभव करण्यात यश आले होते. आशा स्थितीत आता आगामी बाॅर्डर-गावस्कर मालिका रंजक होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

हेही वाचा-

आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, घरात घुसून इंडिजवर गाजवले वर्चस्व
ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा ही स्पर्धा गाजवणार, पाहा कधी होणार सामने
नीरज चोप्रा 90 मीटरचा टप्पा कधी ओलांडणार? गोल्डन बॉय स्वतः म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---