---Advertisement---

IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, 519 ​​दिवसांनी या खेळाडूचे कमबॅक

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 12:18 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथील ओव्हल मैदनावर खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा यजमान संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. ज्यांना या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल जाहीर केला आहे.

पर्थ कसोटी सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला. जेव्हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ॲडलेड कसोटीपूर्वी बाहेर पडला होता. आता त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा सामवेश करण्यात आला आहे. ज्याच्या पुष्टी खुद्द संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत प्लेइंग 11 मध्ये समावेश केल्याची पुष्टी केली आहे. या बदलाशिवाय ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल झालेला नाही. स्कॉट बोलंडने 2023 मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता 519 दिवसांनंतर तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या प्लेइंग 11 मध्ये सामील झाला आहे.

स्कॉट बोलंडबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामने भारतीय संघाविरुद्ध खेळले आहेत. ज्यात त्याने 27.80 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध मायदेशात कसोटी सामना खेळण्यासाठी बोलंड पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. बोलंडच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 10 सामन्यांमध्ये 20.34 च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची प्लेइंग- 11

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड

हेही वाचा-

रेकाॅर्डब्रेक..! टी20 मध्ये वनडे इतकी टोटल, 20 षटकांत या संघाने ठोकल्या चक्क 349 धावा
IND VS AUS; ॲडलेडची खेळपट्टी फलंदाजांची डोकेदुखी? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट!
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय लवकरच, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांची काही तासांत महत्वाची बैठक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---