भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी केली. ज्यात त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 22वे अर्धशतक झळकावले. जडेजाने ही अर्धशतकी खेळी अशा वेळी खेळली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीला आला आणि राहुलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. एकीकडे राहुल 86 धावा करून बाद झाला. पण जडेजाने क्रीजवर चिवट खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2017 पासून, जडेजा असा फलंदाज बनला आहे. ज्याने कसोटीत 7व्या किंवा खालच्या क्रमावर फलंदाजी करताना सर्वाधिक 50+ धावा केल्या आहेत.
2017 कसोटीत 7व्या किंवा खालच्या क्रमावर फलंदाजी करताना सर्वाधिक 50+ धावा
रवींद्र जडेजा – 15
निरोशन डिकवेला – 12
आगा सलमान – 11
क्विंटन डी कॉक- 11
ॲलेक्स कॅरी – 10
मेहदी हसन मिराज – 10
या व्यतिरिक्त सर रवींद्र जडेजा हे जागतिक क्रिकेटमधील केवळ तिसरा क्रिकेटपटू बनला आहे. ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 6 किंवा त्याहून अधिक 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा आणि 75 पेक्षा जास्त बळी घेण्याचा विक्रम आहे. त्याच्या आधी असा पराक्रम विल्फ्रेड रोड्स आणि इयान बोथम यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत केला होता. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकूण 89 विकेट्स घेतल्या असून 6 50+ धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
गाबा कसोटी सामन्यात भारतीय संघाचे शीर्ष फळीतील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. मात्र केएल राहुलने 86 धावांची खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 152 आणि स्टीव्ह स्मिथने 101 धावा केल्या. त्यांच्या दोन्ही डावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघ 445 धावा करण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा-
IND VS AUS; रोहित शर्माची सरासरी SENA देशांमध्ये भुवनेश्वर कुमारपेक्षा कमी
NZ VS ENG; शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा मोठा विजय, पण मालिका इंग्लंडच्या खिश्यात
3 कारणे ज्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार