भारतीय संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) पॉइंट टेबलच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माजी कांगारू कर्णधाराला विचारण्यात आले की, कोणत्या भारतीय फलंदाजाची फलंदाजी पाहण्यात सर्वात जास्त आनंद मिळते? ज्यावर त्याने आर्श्चकारक प्रतिक्रिया दिला आहे.
रिकी पाँटिंगला रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांची फलंदाजी पाहणे आवडत असले तरी त्याला कोणत्या फलंदाजाला पाहायला आवडते? रिकी पाँटिंग म्हणाला की, “असे अनेक भारतीय फलंदाज आहेत ज्यांना मला पाहायला आवडते. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि ऋषभ पंत सारखी नावे आहेत, पण मला माहित नाही की तुम्ही लोकांनी संजू सॅमसनला किती पाहिले आहे? मला हा फलंदाज खूप आवडतो. विशेषत: संजू सॅमसनला टी20 फॉरमॅटमध्ये पाहण्यात मजा येते.”
रिकी पॉन्टिंगने आयपीएलमध्ये संजू सॅमसनसोबत काम केले आहे. संजू सॅमसन जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. तेव्हा रिकी पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र, आता रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स सोडली आहे. दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर रिकी पाँटिंग पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. याआधी रिकी पाँटिंग मुंबई इंडियन्सचा देखील मुख्य प्रशिक्षक होता. रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षणात मुंबई इंडियन्स दोनदा चॅम्पियन बनली. तसेच तो आयपीएलमधील एक खेळाडू म्हणून, रिकी पाँटिंग मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता.
हेही वाचा-
“टीम इंडियाला पराभूत करणे हेच अंतिम ध्येय…”, पॅट कमिन्सची खोचक प्रतिक्रिया
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?
मुंबई कसोटीपूर्वी या नवख्या खेळाडूला संघात स्थान! रोहितची खेळी की कोच गंभीरचा विश्वास?