भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कारकिर्दीतील एक मोठी उपलब्धी साधली. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर रिषभ पंतने उस्मान ख्वाजाला झेलबाद केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील यष्टीरक्षक म्हणून हा त्याचा 150 वा बाद ठरला. कार अपघातानंतर जेव्हा तो या वर्षी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतला तेव्हा त्याच्या फिटनेसबद्दल सर्वांच्या मनात चिंता होती. पण पंतने मर्यादित षटकांमध्ये आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पूर्णपणे फिटनेस सिद्ध करण्याचा प्रयत्न केला .
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून 150 विकेट पूर्ण करणारा रिषभ पंत हा तिसरा खेळाडू आहे. या यादीत त्याच्या पुढे टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सय्यद किरमाणी आहेत. पंतने आतापर्यंत 41 कसोटी सामन्यांमध्ये 135 झेल घेतले आहेत आणि 15 स्टंपिंग केले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या धोनीने कसोटी कारकिर्दीत यष्टिरक्षक म्हणून एकूण 294 बाद केले आहेत. ज्यात 256 झेल आणि 38 स्टंपिंगचा समावेश आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सय्यद किरमाणीच्या नावावर 198 बाद आहेत. ज्यात त्याने 160 झेल घेतले आहेत आणि 38 स्टंपिंग करण्यात यश मिळवले आहे. आता किरमाणीला मागे सोडण्यासाठी पंतला कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून आणखी 49 बाद करावे लागतील.
ब्रिस्बेनचे गाबा स्टेडियम रिषभ पंतसाठी खूप खास आहे. कारण या स्टेडियममध्ये टीम इंडियाने गेल्या वेळी ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले होते. तेव्हा रिषभ पंतच्या बॅटमधून एक उत्कृष्ट नाबाद अर्धशतक सामना विजयी खेळी पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा सर्व भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. या मालिकेत आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांपैकी टीम इंडियाने एक तर ऑस्ट्रेलियन संघाने एक जिंकला आहे.
हेही वाचा-
हा युवा खेळाडू होऊ शकतो आरसीबीचा नवा कर्णधार, 13 वर्षांनंतर संघाला फायनलमध्ये पोहोचवले
ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडीत, किवी कर्णधाराने रचला इतिहास
ज्युनियर आशिया कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, विजेतेपदासाठी या संघाशी सामना