---Advertisement---

कसोटीत टी20 खेळी..! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पंतनं धो धो धुतलं, रचला ‘विराट’ विक्रम

---Advertisement---

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत टी20 स्टाईल फलंदाजी केली. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने 6 चौकार आणि 3 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह पंत पुन्हा एकदा भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. याशिवाय पंत ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघाचा खेळाडू म्हणून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला.

पंतने आक्रमक फलंदाजी करत 33 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 184.85 होता. पंतने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी, 2022 मध्ये, त्याने बेंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. यासह तो भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला होता. आता सिडनी कसोटीत 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून पंत पुन्हा एकदा आपल्या विक्रमाच्या जवळ आला आहे. माजी कर्णधार कपिल देव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांनी 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

भारतासाठी कसोटीतील सर्वात वेगवान अर्धशतक

28 चेंडूत रिषभ पंत विरुद्ध श्रीलंका, बेंगळुरू, 2022
29 चेंडूत रिषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2025
30 चेंडू कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, कराची, 1982
31 चेंडू शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, ओव्हल, 2021
31 चेंडूत यशस्वी जयस्वाल विरुद्ध बांग्लादेश, कानपूर, 2024.

पंतने यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचही कसोटी खेळल्या. पंत पहिल्या चारही कसोटीत संघर्ष करताना दिसला ज्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. आता पाचव्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात पंतने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले.

सिडनी कसोटीचा दुसरा दिवसा संपला असून भारतीय संघ 145 धावांनी आघाडीवर आहे. ज्यामध्ये रिषभ पंतने आक्रमक अर्धशतकी खेळी खेळली. तर सध्या रवींद्र जडेजा आणि वाँशिग्टन सुंदर क्रीझवर आहेत. तत्तपूर्वी पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाला 181 धावाच करता आल्या. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णाने 3-3 विकेट घेतल्या. बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

हेही वाचा-

ॲंकरने ‘थँक्यू रोहित’ म्हटल्यावर हिटमॅनने दिले मुंबई स्टाईल उत्तर, ‘अरे भाई…’
‘ओये काॅन्ट्स…शॉट्स दिसत…’, जयस्वालने केली ऑस्ट्रेलियन सलामीवीराची थट्टा..!
‘तुला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला का?’, वैतागलेला रोहित म्हणाला….

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---