---Advertisement---

तिसऱ्या वनडेआधी भारताला जबरदस्त मोठा धक्का, हे दोन खेळाडू झाले दुखापतग्रस्त

On: शनिवार, जानेवारी 18, 2020 12:19 PM
---Advertisement---

शुक्रवारी (17 जानेवारी) राजकोट (Rajkot) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना (Second ODI Match) पार पडला. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकला (Won by 36 Runs). तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.

भारतीय संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) जखमी होऊन दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर आता भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) दुसऱ्या सामन्यात जखमी झाले आहेत.

हा सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) रोहितच्या दुखापतीवर प्रश्न विचारले असता तो म्हणाला की रोहितची दुखापत गंभीर नाही.

“रोहितच्या डाव्या खांद्याला मार बसला आहे. तो पुढच्या सामन्यासाठी तयार होईल,” असे विराट यावेळी म्हणाला.

धवनला फलंदाजी करताना तर रोहितला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे. भारताकडून फलंदाजी करताना 9.2 षटकात पॅट कमिन्सचा वेगवान चेंडू धवनच्या बरगडीवर लागला. यानंतर, धवन जखमी झाला आणि मैदानावर झोपला. त्यामुळे फिजिओने मैदानावर येऊन धवनला तपासले. पण नंतर धवनने उत्कृष्ट फलंदाजी करत 96 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना 42.2 षटकात बाऊंड्री लाईनवर चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात रोहित जखमी झाला. चेंडू पकडल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो पाठीवर पडला. यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले.

या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक वनडे सामना बेंगळुरू (Bangalore) येथे 19 जानेवारीला पार पडेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---