टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा अर्थ असा नाही की तो निवृत्ती घेणार आहे. यासोबतच हिटमॅनने असेही सांगितले की, त्याचा खराब फॉर्म पाहता पाचवा आणि शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला होता, त्याने हा निर्णय सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना सांगितला. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार आहे.
दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आले की त्याला संघातून वगळण्यात आले आहे, विश्रांती घेतली आहे की त्याने स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? याला उत्तर देताना भारतीय कर्णधार म्हणाला, “असे काही नाही. मी स्वतः बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून धावा होत नाहीये, म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे”.
Question – reports were there you were rested, dropped or opted out?
Rohit Sharma – none, I stood down. I told the selectors and coach that runs are not coming from my bat, so I decided to step away. pic.twitter.com/hAHKW7BJx9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
या मालिकेत रोहित शर्माला काही खास कामगिरी करत आलेली नाही. त्याने पाच डावात केवळ 31 धावा केल्या आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताला काही विषेश कामगिरी करता आले नाही. संघाने पहिल्या डावात केवळ 185 धावा केल्या. ज्यामध्य रिषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत बोलंडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात खेळताना या बातमीखेरीस 139 धावा केल्या आहे. मोबदल्यात संघाने 6 विकेट्स देखील गमावल्या आहेत.
5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. सिडनी कसोटी जिंकण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संघाला कायम राखता येणार येईल. तर WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम राहतील.
हेही वाचा-
आजची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, रोहित शर्मा क्रिकेटमधून…
रोहित ‘द ग्रेट लीडर’! ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हिटमॅनची मैदानात एन्ट्री, संघाचं मनोबल वाढवलं
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियन भूमीवर रचला इतिहास, 47 वर्ष जुना विक्रम मोडला