भारतीय संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे दुसर्या सामन्यात बरोबरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. दोन्ही संघात मेलबर्न येथे 26 डिसेंबरला ‘बॉक्सिंग डे’ सामना खेळला जाईल. त्यामुळे या सामन्यापूर्वी भारतीय संघ नेटमध्ये खूप घाम गाळत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी संघाचा सर्वात जास्त विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराकडून भारतीय डावाची सुरुवात करायला हवी, असा सल्ला दिला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली उर्वरीत तीन सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. या शिवाय भारतीय संघ व्यवस्थापकांना सलामी जोडीबद्दल विचार करावा लागणार आहे. पृथ्वी शाॅच्या खराब फॉर्ममुळे मयंक अगरवालसोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी कोण येणार याबद्दल सध्या खूप चर्चा आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शाॅ आणि शुबमन गिल यांच्या नावांबद्दल विचार केला जात आहे. त्याचबरोबर केएल राहुलसुद्धा डावाची सुरुवात करू शकतो. यामध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या पुजाराचे नाव संजय मांजरेकर यांनी सलामी फलंदाज म्हणून सुचवले आहे. पुजाराकडे विदेशात खेळण्याचा खूप अनुभव आहे आणि त्याच्याकडे विकेट वाचविण्याची क्षमता आहे.
संजय मांजरेकर ट्वीट करताना म्हणाले, “मी विदेशी दौऱ्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तुम्हाला काही वेळा लवकर फलंदाजी करण्यासाठी उतरावे लागते. पहिल्या चेंडूपासून आव्हान अवघड असते. कोणी पुजाराकडून डावाची सुरुवात करण्याचा विचार करत आहे का? यामुळे काम सोपे होईल आणि त्याचबरोबर सुरुवातीला विकेट न गमावता गोलंदाजांना आपल्यावर सरस ठरण्याची संधी सुद्धा देणार नाही. पुढील सामन्यासाठी आपले चार टॉप फलंदाज सांगा.”
I have batted no 3 overseas. You are invariably going in early, facing bowlers with their tails up from ball no 1.
Anyone for Pujara opening? To make his life easier? + better chance of not losing a quick wkt & opposition being on top early. Tell me your top 4 next Test👍— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) December 23, 2020
चेतेश्वर पुजाराची कामगिरी
पुजाराने भारतीय संघासाठी आतापर्यंत 78 कसोटी सामने खेळताना त्यापैकी 130 डावात फलंदाजी केली आहे. त्याने 48.22 सरासरीने 5883 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची नाबाद 206 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने कसोटीत तीन वेळा दोनशे पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 18 शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना