भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (8 डिसेंबर) सिडनीत खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. मात्र, ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. या मालिकेत सर्वात जास्त वेगवान गोलंदाज टी नटराजनने प्रभावित केले. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आता तर ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरने त्याची स्तुती केली आहे.
वॉर्नरने नटराजनचे कौतुक करताना इंस्टाग्रामवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. या पोस्टमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाच्या जर्सीत दोघे दिसत आहेत. त्यावर त्याने लिहिले आहे की, “विजय, पराजय आणि अनिर्णित काहीही असो आम्ही मैदानावर एकमेकांचा सन्मान करतो. मालिका पराभूत झाल्यानंतरही मी नटराजनसाठी याच्यापेक्षा जास्त आनंदी होवू शकत नाही. चांगला मुलगा आहे आणि त्याचे फक्त खेळावर प्रेम आहे. नेट बॉलर ते वनडे आणि टी-20 संघाचे प्रतिनिधित्व, काय कमाल कामगिरी आहे, खुपच छान!”
https://www.instagram.com/p/CIkCcGMrBiU/?utm_source=ig_web_copy_link
नटराजनने या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत 83 धावा देताना 6 बळी टिपले होते. तो सर्वात यशस्वी गोलंदाजपैकी एक आहे. त्यामुळे या गोलंदाजांवर दिग्गजांकडून कौतुकाची थाप पडत आहे. या गोलंदाजाने वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यापासून तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. वॉर्नरने आधीही त्याचे अभिनंदन केले होते.
भारताच्या या वेगवान गोलंदाजाचे नाव सध्या क्रिकेट विश्वात खुपच चर्चेत आहे. हा गोलंदाज आयपीएल स्पर्धेत वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली सनराययजर्स हैदराबाद संघासाठी मागील तीन वर्षांपासून खेळत आहे. तो याॅर्कर किंग या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यामधे एका षटकातील पाच चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू