भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळवली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. पहिला बदल कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पाहायला मिळाला. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. याशिवाय आकाशदीपच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसीध कृष्णाला संधी मिळाली. या सामन्यात रोहित शर्मा बाहेर झाला, पण टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये कोणताही सुधारणा झाली नाही.
मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत हिटमॅन ओपनिंग करताना दिसला होता. आता सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप होताना दिसली. रोहितच्या बाहेर पडल्यामुळे संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये कोणताही बदल झाला नाही. उपाहारापूर्वी, म्हणजे पहिल्याच सत्रात संघाची आघाडीची फळी पॅव्हेलियनमध्ये परतली.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने पुन्हा एकदा सलामीची जबाबदारी घेतली. तरीही राहुल काही विशेष करू शकला नाही. संघाने 5 व्या षटकात राहुलच्या रूपाने पहिली विकेट गमावली. जो केवळ 04 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाला दुसरा झटका यशस्वी जयस्वालच्या रूपाने 8व्या षटकात बसला. जयस्वालने 1 चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. यानंतर काही काळ कोहली आणि शुबमन गिलने डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.
पण ही भागीदारी उपाहारापूर्वी केवळ एका चेंडू आधी संपुष्टात आली. उपाहारापूर्वी एक चेंडू आधी शुबमन गिल 2 चौकारांच्या मदतीने 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे पहिल्याच सत्रात टीम इंडियाची टॉप ऑर्डर 57 धावांवर कोसळली. जयस्वालला स्कॉट बोलंडने, केएल राहुलला मिचेल स्टार्कने आणि शुबमन गिलला नॅथन लियॉनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हेही वाचा-
रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम, भारतीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
वारंवार तेच.! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही फ्लाॅप
IND vs AUS; ‘रोहित शर्मा’ला विश्रांती की खराब फॉर्ममुळे प्लेईंग 11 मधून वगळले?