ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील दुसरा टी-20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपुरमध्ये खेळला जाणार आहे. बुथवारी (21 सप्टेंबर) भारतीय संघ हा पुढचा सामना खेळण्यासाठी नागपुरमध्ये दाखल झाला. नागपुरमध्ये पोहोचताच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने एका लहान चाहत्याचा दिवस सार्थकी लावला.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, नागपुरच्या विमानतळावर भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. आवडत्या खेळाडूंची एक झलप पाहण्यासाठी चाहते विमानतळासोबतच खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्या हॅटेलमध्ये देखील गर्दी केली होती. संघ विमनातळातून बाहेर येत असताना माजी कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांकडे पाहून हात वर केल्याचे दिसले. तर दुसरीकडे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) एका हलान चाहत्याला बॅटवर स्वाक्षरी देताना दिसला. रिषभच्या या चाहत्याने कसोटी क्रिकेटच्या पांढरी जर्सी घातली होती.
Touchdown Nagpur ????????#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/Odt7nFjlTe
— BCCI (@BCCI) September 21, 2022
दरम्यान, भारतीय संघासाठी मालिकेतील हा दुसरा सामना करा किंवा मरा अशा स्वरूपातील असेल. संघाने जर या सामन्यात विजय मिळवला, तर संघ मालिका जिंकेल याची आशा कायम राहील. भारताने जर हा सामना गमावला, तर ऑस्ट्रेलियन संघ विजयी आघाडी घेईल. तत्पूर्वी मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती. पण तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंचने यजमान भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करतान भारतीय संघाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे मोठे लक्ष्य 4 विकेट्स राखून 19.2 षटकात गाठले. भारतासाठी हार्दिक पंड्या (30 चेंडूत नाबाद 71 धावा) आणि केएल राहुल (35 चेंडूत 55 धावा) यांनी अर्धशतके केली. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्यांदाचा सलामीसाठी आलेल्या कॅमरून ग्रीनने त्याच्या संघासाठी सर्वाधिक 61 धावांचे योगदान दिले. तसेच वेगवान गोलंदाज नाथन एलिसने चार षटकात 30 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शार्दुल-कुलदीपच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंड फुस्स! इंडिया ए चा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स संघाला विजेतेपद
गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अर्जुन कढे, ऋतुजा भोसले हे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार