भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चर्चेत आहे. वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि सहावी विश्वचषक ट्रॉफी जिंकली. सध्या या दोन संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. पहिल्या दोन सामन्यांतील विजयानंतर सूर्यकुमार यादवचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण अशातच वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल याचे एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 मालिकेत भारतीय संघ अप्रतिम प्रदर्शन करत आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नेतृत्व आणि वैयक्तिक प्रदर्शनाच्या बाबतीत कुठेच कमी पडताना दिसला नाहीये. आपल्या 360 डिग्री फटकेबाजीसाठी सूर्यकुमारची तुलना नेहमीच एबी डिविलियर्स सोबत होत आली आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात त्याने केलेल्या धमाकेदार खेळीनंतर कहीजण त्याला युनिवर्स बॉल असेही म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर ख्रिस गेल (Chris Gayle) याची प्रतिक्रिया महत्वाची ठरते.
ख्रिस गेल (Chris Gayle) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजी म्हणून ओळखला जाते. समोर कोणताही फलंदाज असला, तरी गेलचा खेळपट्टीवरील दरार कधी कमी झाला नाही. कधी कोणता चेंडू सीमारेषेबाहेर जाईल, हे गोलंदाज आणि विरोधी संघाला कळत देखील नसे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार असा फलंदाज आहे, ज्याची तुलना गेलसोबत केली जाते. असे असले तरी, गेलला मात्र सूर्यकुमार आपली बरोबरी करू शकतो, असे वाटत नाही.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल सूर्यकुमारविषयी म्हणाला, “इथे कोणी दुसरा ख्रिस गेल नाहीये. इथे फक्त एकटाच यूनिवर्सल बॉस आहे.” गेलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये केलेली आक्रमक फलंदाजी पाहून त्याला युनिवर्सल बॉस अशी ओळख मिळाली होती. त्याची ही ओळख कधीच पुसली जाऊ शकत नाही. त्याच्या मते सूर्यकुमार देखील स्वतःला यूनिवर्सल बॉस म्हणवून घेऊ शकत नाही. असे असले तरी, गेलने रोहित शर्मा याच्या आक्रमक खेळीचे कौतुक केले, जी त्याने वनडे विश्वचषक स्पर्धेत केली होती. “मला आक्रमक फलंदाजी आवडते. गोलंदीज उद्ध्वस्त कराताना मला आनंद मिळतो. असे करणाऱ्यांपैकीच रोहित शर्मा हा एक खेळाडू आहे.”
(IND vs AUS t20i series Chris Gayle’s statement about Suryakumar Yadav)
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! बुमराहच्या Insta Storyने माजवली खळबळ, मुंबईला केलं अनफॉलो; RCB संघात जाणार का? चाहतेही गोंधळात
भारताकडून सलग 2 सामने हारताच ऑस्ट्रेलिया संघात 6 धक्कादायक बदल, मॅक्सवेलसह ‘हे’ वर्ल्डकप स्टार परतणार मायदेशी