भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 150 धावा केल्या आहेत. कर्णधार जसप्रीत बुमराहने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला जे की टीम इंडियासाठी अयोग्य ठरला. ऑस्ट्रेलियाच्या शानदार गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. सातत्याने विकेट गमावत राहिल्याने संघाला केवळ सर्व विकेट गमावून 150 धावा करत्या आल्या. ज्यामध्ये पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या नितीशकुमार रेड्डीने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर यजमान संघाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
भारतीय डावाची सलामी देण्यासाठी आलेली यशस्वी जयस्वाल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कललाही आपले खाते उघडता आले नाही. जोश हेझलवूडने विराट कोहलीला 5 धावांवर बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. उपाहाराची घोषणा होण्यापूर्वी केएल राहुल स्टार्कच्या गोलंदाजीवर 26 धावांवर वादग्रस्त बाद ठरला.
लंच ब्रेकनंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (11) आणि वॉशिंग्टन सुंदर (4) यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माैल्यवन 37 धावा केलेल्या रिषभ पंतला कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी जोपर्यंत खेळपट्टीवर होते. तोपर्यंत भारत 200 धावापर्यंत पोहचू शकतो असे दिसत होते. मात्र पॅट कमिन्सने रिषभ पंताला माघारी पाठवत भारतीय चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले. पंत आणि रेड्डी यांच्यात सर्वाधिक 48 धावांची भागिदीरी झाली.
यानंतर हर्षित राणा 7 धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह 8 धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीश राणाच्या रूपाने बसला. जोश हेझलवूडशिवाय पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी 2-2 विकेट घेतल्या. आता अश्या परिस्थितीत भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लवकर बाद करण्याचे अव्हान असणार आहे.
Nitish – 41 (59).
Pant – 37 (78).
KL Rahul – 26 (74).INDIA BOWLED OUT FOR 150. HAZLEWOOD PICKED 4/29. pic.twitter.com/U4cib3VVG5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 22, 2024
हेही वाचा-
आयपीएल मेगा लिलावाची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार खेळाडूंचा लिलाव
हा कसला किंग? ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीची बॅट चालेना, पुन्हा एकदा स्वस्तात बाद!
शुबमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अपडेट, जाणून घ्या कधी मैदानात परतणार