भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फळंदाज विराट कोहली शनिवारी (18 फेब्रुवारी) ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. ऑस्ट्रेलियासाठी त्याचा पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमन याने पहिल्या डावात विराटला तंबूत धाडले. पंचांच्या निर्णयानंतर विराटने रिव्यू घेतला होता, मात्र तिसऱ्या पंचांनी देखील त्याला बाद करार दिला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS Test Series) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली (Virat Kohli) 84 चेंडू खेळला आणि 44 धावा केल्या. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियान संघ 263 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारती सलामीवीर जोडीही स्वस्तात बाद झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट खेळपट्टीर सेट झाला असे वाटत असतानाच मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याने त्याला पायचीत पकडले. भारताची धावसंख्या 135 असताना विराटने ही विकेट गमावली. बाद झाल्यानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या विकेटची रिव्यू पाहताना चिंडलेला दिसला.
Virat Kohli was clearly unhappy watching his wicket's replay in the dressing room. pic.twitter.com/ly4kWbwawY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 18, 2023
Luck is not near for Kohli in Tests. pic.twitter.com/QUCyg4ig1a
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2023
पहिल्या डावातील 50 व्या षटकात कुह्नेमनच्या हाती ही मोठी शिकार लागली. या षटाकतील तिसरा चेंडू विराटच्या बॅट आणि पॅडला लागला. पंचांनी त्याला बाद घोषित केले. पण विराटने रिव्यू घेतला. रिव्यूमध्येही तो बाद आहे किंवा नाही, हे स्पष्टपणे समजू शकत नव्हते. पण अखेर अंपायर्स कॉलमुळे त्याला विकेट गमवावी लागली. विराटच्या विकेटपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी खेळपट्टीवर आला होता. रोहितने 69 चेंडूत 32 धावा करून विकेट गमावली. संघाचा दुसरा सलामीवीर केएल राहुल 41 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.
Virat Kohli wicket rewatch 🤡 It's clearly pad first 😌#INDvAUS pic.twitter.com/cxKf0FTAcB
— 🄺Ⓐ🅃🄷🄸🅁 1⃣5⃣ (@katthikathir) February 18, 2023
Kohli looked angry after being given out by the third umpire.#INDvAUS #ViratKohli𓃵 #Umpire pic.twitter.com/AiE8gbcDkd
— Akhil Gupta 🏏 (@Guptastats92) February 18, 2023
दिल्लीत सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. पण खेळपट्टी पुन्हा एकदा नागपूर कसोटीप्रमाणेच फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायाला मिळाले. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन यानेही सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाच विकेट्सचा हॉल पूर्ण केल्या. भारताच्या पहिल्या सात विकेट्सपैकी पाच विकेट्स एकच्या लायनने घेतल्या. (Fans are upset with the umpires after Virat Kohli was dismissed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद
चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर