Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सचिननंतर ‘अशी’ कामगिरी विराटलाच जमली, धोनी-द्रविड यादीत खूपच मागे

सचिननंतर 'अशी' कामगिरी विराटलाच जमली, धोनी-द्रविड यादीत खूपच मागे

February 18, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli, MS-Dhoni, Sachin-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झाली. दिल्लीच्या अनुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज विराट कोहली सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फळंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. शनिवारी (18 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळपट्टीवर आल्यानंतर विराटने एका खास विक्रमाची नोंद स्वतःच्या नावावर केली.

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय गोलंदाजी आक्रमाणाने चांगली कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर गुंडाळला. पहिल्याय दिवसाचा खेळ संपेण्यापूर्वी भारताने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या. दिल्लीत सुरू असलेल्याया कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) खेळपट्टीवर आला. विराटने पहिल्या डावात भारतासाठी 84 चेंडूत 44 धावांची खेळी केली. दरम्यान, ही 100वी वेळ होती, जेव्हा विराट कोहली ऑस्ट्रेलियन संघासमोर फलंदाजीला उभा राहिला होता.

ऑसट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजीला आलेल्या भारतीयांच्या यादीत 100चा आकडा पूर्ण करणारा विराट दुसरा खेळाडू आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 144 इनिंग खेळल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 100 इनिंगसह विराट कोहली (Virat Kohli) आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर प्रत्येकी 96-96 इनिंगसह एमएस धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक इनिंग खेळणारे भारतीय फलंदाज
144 – सचिन तेंडुलकर
100 – विराट कोहली
96 – एमएस धोनी
96 – राहुल द्रविड

दरम्यान, दिल्लीत सुरू अससेल्या या कसोटी सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताचे पारडे पहिल्या दिवसानंतर जड असल्याचे दिसले. पहिल्या डावात भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी () याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नाथन लायन याने भारताच्या पहिल्यात 7 पैकी 5 विकेट्स घेतल्या. (Virat Kohli became the second Indian batsman to play 100 innings against Australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर
स्टोक्सचा भीम पराक्रम! कसोटीत केली कुणालाही न जमलेली कामगिरी; प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला


Next Post
Nathan-Lyon

मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत 'बाप' कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी 'हा' भारतीय

Virat Kohli

विराटच्या विकेटमुळे पेटला वाद! चाहते पंचांच्या निर्णयावर नाराज

Matthew-Kuhnemann-And-Virat-Kohli

'या' 5 गोलंदाजांचा पदार्पणाच्या कसोटीतील पहिला बळी ठरलाय कोहली, यादीतील तीन खेळाडू एकाच देशाचे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143