---Advertisement---

स्मिथविरुद्ध कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमला नव्हता तो पराक्रम अश्विनने करुन दाखवला

---Advertisement---

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामना शनिवारी (२६ डिसेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या सत्राची सुरुवात ऑस्ट्रेलियासाठी खराब ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ३ विकेट्स लवकर गमावल्या. यात धोकादायक स्टिव्ह स्मिथच्या विकेटचाही समावेश आहे. स्मिथला सामन्याच्या १५ व्या षटकात आर अश्विनने बाद केले. स्मिथचा झेल चेतेश्वर पुजाराने घेतला. विशेष म्हणजे स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. तो शुन्यावर बाद झाला.

कारकिर्दीत कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्यांच शुन्यावर बाद

कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यातील पहिल्याच डावात स्मिथ पहिल्यांदाच शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ वर्षात कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तो कधीही एकेरी धावसंख्येवर बाद झाला नव्हता. याआधी शेवटचे तो २०१५ ला नॉटिंगघम कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. त्यावेळी त्याने ६ धावा केल्या होत्या.

भारताविरुद्ध पहिल्यांच शुन्यावर बाद 

खास गोष्ट अशी की स्टिव्ह स्मिथ पहिल्यांदाच भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. याआधी कधीही तो भारताविरुद्ध शुन्यावर बाद झाला नव्हता. त्यामुळे स्मिथला शुन्यावर बाद करणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

स्मिथने भारताविरुद्ध त्याच्या कारकिर्दीत ३९ सामने खेळले आहेत यातील ४७ डावात खेळताना त्याने ६३.३३ च्या सरासरीने २६६० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

सन २०१६ नंतर पहिल्यांदाच शुन्यावर बाद –

स्मिथ त्याच्या कसोटी कारकिर्दीत केवळ पाचव्यांदाच शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे सन २०१६ नंतर पहिल्यांदाच स्मिथ शुन्यावर बाद झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच

जड्डूची कमाल! मॅथ्यू वेडचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची ‘सेंच्यूरी’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---